ताज्या घडामोडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई,,, अवैध गावठी दारू भट्टी उध्दवस्त

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मा, पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉ, डी,एस स्वामी तसेच अपर पोलीस अधीक्षक दिपाली धाटे यांनी जिल्हा पोलिस दलाच्या कार्यक्षेत्रात अवैध दारू, जुगार तसेच अमली पदार्थ आणि बेकायदेशीर मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी व या वर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी सुचना दिल्या असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण ठाणे जिल्ह्यातील अशा प्रकारे अवैध दारू, जुगारा बाबत माहिती माहिती संकलक करुन त्यावर कारवाई करण्यासाठी विविध पथकांची स्थापना करुन त्या संबधांने कारवाई होण्यासाठी मार्गदर्शन केले होते,


वरिष्ठांच्या सुचना आणि आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या वाशिंद युनिट पथकाला दिनांक १/५/२०२४ रोजी किन्हवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कांवा गावात राहणारा केशव कृषण वारघडे वय वर्षे ४४ राहणार वेळुक पोस्ट शिरोसा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे,हा मौजे कांबा गावातील ओहळा जवळील जंगलात गावठी हातभट्टीची दारु बनवत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असताना सदर ठिकाणी छापा टाकून या ठिकाणी ७ प्लास्टिक आणि लोखंडाचे ड्रम त्यात प्रत्येकी दोनशे लिटर गुळ नवसागर मिश्रित रसायने भरलेले असे एकुण १४०० लिटर वॉश, एक लोखंडी ढोल तसेच गावठी हातभट्टीची दारु बनवण्यासाठी वापरात असलेला एकुण १,१७,४००/_रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला असून, पोलिस पथकाने हा सर्व माल जप्त केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, या बाबत पुढील तपास किन्हवली पोलिस करत आहेत

,
सदरची कारवाई ही मा, पोलिस अधीक्षक श्री, डॉ, डी, एस स्वामी तसेच मा,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती दीपाली धाटे, यांनी दिलेल्या सुचना व आदेशानुसार श्री सुरेश मनोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वाशिंद युनिट मधिल उपनिरीक्षक महेश कदम, पोलिस हवालदार/२४०७ प्रकाश साईल पोलिस हवालदार/२५०७ संतोष सुर्वे पोलिस शिपाई/३२८० स्वप्नील बोडके यांच्या पथकाने सदरची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.