आजादी का अमृत महोत्सव ‘आदिवासी वाडी या ठिकाणी साजरा करण्यात आला.* *बदलापूर:-*

देशात सगळीकडे ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा होत असून मा.पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून हर घर झेंडा ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार आज बदलापूर पुर्व आदिवासी वाडी येथे मस्जिदे उस्मानिया व अनवर शेख कृष्णा मुकणे यांच्या कार्यालयात सकाळी ८:०० वाजता आदराने झेंडा फडकविण्यात आला व सलामी देण्यात आली.
याप्रसंगी मस्जिदचे अध्यक्ष अनवर शेख, मस्जिदचे इमाम एमडी हुसेन,मस्जिदचे कोषाध्यक्ष कमाल शेख, रब्बानी शेख, हैदर शेख, अकील शेख,सलमान शेख, अशरफ शेख, असिफ शेख, शेख, सोहेल शेख इत्यादी सर्व मस्जिदचे सहकाऱ्यांनी उपस्थित राहून अभिमानाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
तसेच अनवर शेख व कृष्णा मुकणे यांच्या कार्यालयातही झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत गायन केले.व झेंड्याला सलामी देण्यात आली. राष्ट्रभक्तीवर गाणे लावण्यात आली होती. शाळेतील मुलांनी आणि जमलेल्या सगळ्यांनी समोसा चटणीचा आणि चहापणाचा आनंद लुटला.याप्रसंगी अल्पसंख्याक अध्यक्ष अनवर शेख,आदिवासी मित्र मंडळ अध्यक्ष कृष्णा मुकणे,वामन मुकणे, सुरेश आंबवले,कौस्तुभ लोखंडे,संतोष यादव,राजू दुर्गुले,श्याम उपाध्याय, सुरेश चव्हाण हे उपस्थित होते. तसेच शाळेतील मुलांनी हा आगळा वेगळा कार्यक्रमाचा आनंद घेतला.