स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वा स्वातंत्र्य दिन विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून जल्लोषात साजरा*

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,केंद्र कोशिंबी ता. भिवंडी,जि.ठाणे येथे सकाळी ठीक 8-00 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी जल्लोषात, घोषणाच्या अतिषबाजीने काढण्यात आली.सर्व विद्यार्थी,पालक, शाळाव्यवस्थापन समिती,ग्रामस्थ सहभागी झाले होते.
तद्नंतर *गृप ग्रामपंचायत सरपंच छाया हरड यांचे हस्ते ध्वज फडकविण्यात आले.ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन करण्यात आले.वंदेमातरम, भारतमाता की जय,अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, असा जल्लोषात जयघोष करण्यात आला*.
याप्रसंगी विद्यार्थी भाषणे,समूहगीते विद्यार्थ्यांनी सादर केली.
*संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले*
*अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गृप ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव यांनी आपले वडील कालकथित अशोक जाधव यांच्या स्मरणार्थ शाळेतील 65 विद्यार्थ्यांना (प्रत्येकी दोन वह्या)वह्या वाटप करण्यात आल्या.तसेच सिद्धोधन जाधव यांनी मोलाचे उद्बोधनपर मार्गदर्शन केले*
*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत दिनांक 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा प्रभात फेरी,बॅनर लावून जनजागृती,चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, आदिवासी जागतिक दिन,वेशभूषा ,बालगोपालांची पंगत,ग्रामपंचायत माध्यमातून फळेवाटप,स्वच्छतादिन,असे अनेक विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट तीन दिवस ध्वजारोहण करण्यात आले*.
ध्वजारोहण कार्यक्रम निमित्त डोहोळे ग्रामपंचायत सरपंच छाया हरड,ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सिद्धोधन जाधव ,विजय हरड,सोयेब शेख,सिरताज शेख,सचिन देशमुख,पंढरी हरड,
शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे,सदस्य अशोक म्हसकर,मुख्याध्यापक जगदीश जाधव, सह शिक्षक अशोक गायकवाड,सहशिक्षिका दिलशाद शेख, विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.