कुळगाव बदलापुर नगरपालिकेचे सि टी इंजिनिअर संजय कुंभार यांची प्रमोशनवर बदली,,
सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपालिकेमध्ये नियुक्तीचे आदेश,,

कुळगाव बदलापुर नगरपालिकेचे सि टी इंजिनिअर संजय कुंभार यांचे प्रमोशन करुन बदली झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, संजय कुंभार हे गेली पाच वर्षे बदलापुर नगरपालिकेत सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत असुन,कुळगाव बदलापुर नगरपालिकेचे सि टी इंजिनिअर भैरव हे सुमारे एक वर्षा पूर्वी सेवानिवृत्त झाले असल्याने, संजय कुंभार यांच्यावर सि टी इंजिनिअर म्हणून प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता, आपल्या कार्यकाळात संजय कुंभार यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन, शहरातील विकासाला चालना दिली आहे,मुळातच त्यांचा प्रेमळ आणि मनमिळावू स्वभाव असल्यामुळे, नगरपालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील लोकप्रतिनिधी, ठेकेदार,विकासक यांच्या बरोबर त्यांचे प्रेमाचे संबंध राहिले आहेत, सर्व समाज घटकांच्या विकासासाठी आपल्या कर्तृत्वाला कोणतीही बाधा न पोहचवता काम करुन घेण्यात संजय कुंभार यांचा हातखंडा आहे, त्यांच्या ऐनवेळी झालेल्या बदलामुळे सर्रच स्तरातुन नाराजी व्यक्त होताना दिसत आहे, बदलापुर शहरा मध्ये अनेक विकासकामे ही प्रगती पथावर असल्याने ती पूर्णत्वास नेण्यासाठी संजय कुंभार यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे, त्या मुळे अधिक काही काळ ही बदली थांबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते,