कुळगाव बदलापुर नगरपालिका साहाय्यक नगररचनाकार अमर गडगे यांची नगररचनाकार म्हणून पदोन्नती

कुळगाव बदलापुर नगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे सत्र सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे, नुकतीच नगरपालिका प्रभारी सि टी इंजिनिअर संजय कुंभार यांचे प्रमोशन होऊन त्यांची सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपालिकेमध्ये नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले आहेत, आणि त्या नंतर बदलापुर नगरपालिकेचे नगररचनाकार सुदर्शन तोडणकर हे सेवानिवृत्त झाल्यापासून नगरपालिकेला नगरचनाकार पुर्णवेळ नसल्याने विकासक तसेच ईतर बांधकाम व्यावसायिकांना अडचणी निर्माण होत असताना बदलापूर नगरपालिकेत पुर्णवेळ नगररचनाकार आणण्याची मागणी विविध माध्यमातून होत होती
याच पार्श्वभूमीवर पालिकेत सुमारे तीन वर्षांपासून कार्यरत असलेले सहायक नगररचनाकार अमर गडगे यांना बढती देऊन त्यांची नगररचनाकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,अमर गडगे यांना स्थानिक प्रश्नांची माहिती असल्याने, शहरातील विकास कामांना आता गती मिळणार असल्याची चर्चा आता होताना दिसत आहे,अमर गडगे हे आता पुर्णवेळ नगररचनाकार म्हणून बदलापुर नगरपालिकेत काम पाहणार असल्याने नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले असून,अमर गडगे यांना मिळालेल्या पदोन्नतीसाठी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे, सचिव श्री भरत कारंडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत,