ठाणे! रिपब्लिकन कामगार सेनेचा समाज कल्याण कार्यालयावर धडक मोर्चा,,,
राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार आंदोलन

रिपब्लिकन कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सर सेनानी आनंदराज आंबेडकर तसेच राज्य अध्यक्ष युवराज दादा बनसोडे यांच्या आदेशानुसार समाज कल्याण कार्यालय कळवा ठाणे, कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
, राज्य शासनाच्या काही योजना ह्या समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या निधीतून राबवण्यात येतात, त्यामुळे अनुसूचित जाती साठी असणारा निधी हा इतरत्र वळवण्यात येतो, जसे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना या निधीचा लाभ होत नाही, या विरोधात रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने दी.14/10/24 रोजी समाज कल्याण विभागाच्या ठाणे कार्यालय येथे धडक मोर्चा काढण्यात आला, या मोर्चात… रिपब्लिकन कामगार सेना राज्य समन्वय भाई विक्रम खरे, रिपब्लिकन सेना ठाणे शहर अध्यक्ष बाबासाहेब येरेकर, ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव वाघमारे , उल्हासनगरचे नेते समसूद्दीन भाई मन्सुरी, ठाणे शहर प्रमुख मार्गदर्शक भारत चित्ते, ठाणे शहर सचिव गौतम दासू, ठाणे शहर संघटक भगवान आदमाने, ठाणे शहर युवा अध्यक्ष अनिल भाई भोसले, गणेश गजमल, सुरेश कनोजिया यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते, मोर्चाचे आयोजन रिपब्लिकन कामगार सेना ठाणे शहर अध्यक्ष राजू दादा दोंदे यांनी केले होते या वेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांना मोर्चाचे निवेदन देऊन ,सहाय्यक आयुक्त यांचे बरोबर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली,