सिध्दार्थ विहार हॉस्टेल दिमाखात* *उभे राहणार* – *मा.आनंदराज आंबेडकर*

मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चे आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर साहेब यांचे आभार
पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या अथक परिश्रमा मुळे सिध्दार्थ विहार हॉस्टेल पुन्हा नव्याने दिमाखात उभे राहणार आहे. आताच्या सरकारने निवेदन पाठवून सदर इमारत नव्याने ऊभी करण्यासाठी रू.४१ कोटी २१ लाख मंजूर केल्याचे जाहीर करण्यात आल्याने आणि हि बातमी स्वता अध्यक्ष मा.आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांनी सिद्धार्थ विहार हॉस्टेल येथील शिक्षण मंत्री मा.दिपक केसरकर यांनी उद्घाटन केलेल्या ठिकाणी हार घालून व पेढे वाटून सर्व प्राचार्या , प्राध्यापक,व शिक्षकेतर कर्मचारी
यांना हि बातमी सांगताच फटाके वाजवून या बातमीचे स्वागत करण्यात आले.सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला. पुढे मा.आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले की,सदर सिध्दार्थ विहार हॉस्टेल चे बांधकाम स्वता सरकारने पैसे संस्थेकडे न देता बांधकाम खात्याकडूनच (PWD,) बांधुन घ्यावे.
सदर आनंदाच्या बातमीने सर्वां मध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. सिद्धार्थ विहार हॉस्टेल हे खेड्यापाड्यातून येऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्या्थ्यांसाठी एक आभ्यासाचे केंद्र बिंदू आसल्यामुळे अनेकांच्या भावना या भ ऐतिहासिक वास्तुशी जोडल्या गेल्या आहेत. थोडक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाचे स्वप्न या माध्मामतून पुन्हा नव्याने पूर्ण होत आहे.
सदर कार्यक्रमा साठी पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य मा.आशिष गाडे, डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.यशोधरा वराळे, डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.डि.ए.गवई हे उपस्थित होते त्यांनी सर्वांना भाषण करून शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.संजय हिराजी खैरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डी. एन्. बनसोडे यांनी केले.