बदलापूर!सीखें संस्थेचे दोन दिवसीय भाषा आणि गणित विषयाची कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

जिल्हा परिषद शिक्षण विभाग ठाणे,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था,राहटोली आणि सीखें यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या टीचर इनोवेटर प्रोग्राम (TIP) अंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील गणित आणि भाषा विषयाच्या शिक्षकांचे दिनांक 3/०१/२०२५ ते ४/०१/२०२५ दोन दिवशी ऑफलाइन प्रशिक्षणाचे आयोजन श्रीजी हॉल, बदलापूर पूर्व,कात्रप या ठिकाणी आनंदमय वातावरणात संपन्न झाला.या दोन दिवसीय कार्यशाळेत अंबरनाथ तालुक्यातील १३७ शिक्षकांनी उत्सपूर्ध सहभाग घेतला.*
*गणित विषयात अपूर्णांक या घटकावर नवीन क्लुप्त्या, दृश्यरूप सादरीकरण, माॕडेल प्रदर्शन, कृतियुक्त अध्यापन आशा विविध अंगांना स्पर्श करून गणित विषयाचे सीखें संस्थेचे प्रोग्राम लीड वर्षा परचुरे मॅडम,विषय तज्ज्ञ आशिष केळशीकर सर,यांनी अपूर्णांकातील बेरीज, वजाबाकी,भागाकार, गुणाकार या संकल्पना नवीन पद्धतीने शिक्षकांन पर्यंत पोहचवल्या. तर भाषा विषयामध्ये गोष्टीची पुस्तके हातालने, गोष्टीच्या पुस्तकांचे महत्व, गोष्टीच्या घटकांची ओळख, विद्यार्थ्याला लेखक कसं बनवता येईल ? यासाठी गोष्टींच्या विविध घटक यावर कृतियुक्य चर्चा सत्र भाषा विषयाच्या सीखे संस्थेच्या विषय तज्ज्ञ स्मिता ढगे मॅडम मार्गदर्शन करून ते विद्यार्थ्यांन परेंत कसे पोहचेल यासाठी शिक्षकांकडून गोष्टी तयार करून घेतल्या.
*या प्रशिक्षणासाठी विशेष उपस्थिती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठाणे (DIET) प्राचार्य सन्माननीय श्री वाघ सर,अधिव्याख्याते श्री कुमार पाटील सर,मुळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश जाधव सर, बोराडपाडा व पिंपलोली केंद्राचे केंद्रप्रमुख भालचंद्र पाटील सर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला ठाणे डायट प्राचार्य वाघ सर, डाएट अधिव्याख्यात कुमार पाटील सर, केंद्रप्रमुख गणेश जाधव सर, श्री. आनंद सोनकांबळे सर (जिल्हा सरचिटणीस-शिक्षक सेना),श्री कल्लप्पा होटकर सर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.*
*प्रशिक्षणाचे महत्व काय? शिक्षकां पुढील आव्हाने, जबाबदाऱ्या या सगळ्या विषयावर त्यांनी हात घातला.* *सीखेँच्या कार्यपुस्तिका, पद्धतीचे शिक्षक विद्यार्थी यांच्या दृष्टीने अध्ययन -अध्यापनातील महत्व काय आहे, त्याची उपयुक्ता काय आहे.याचे विश्लेषण करून त्यांनी सीखेंच्या सीखे संस्थेच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या.*
*प्रशिक्षणा वेळी सीखे संस्थेच्या नॅशनल लीड वर्षा परचुरे मॅडम या कार्यशाळेला उपस्थित होत्या. प्रशिक्षण व्यवस्थित पारपडण्यासाठी ठाणे सिखें टीमच्या जिल्हा समन्व्यक अश्विनी पाटील,मनोहर कामनकर,उत्कर्षा पाटील, नरेश सोनवणे,योगिता रहाटे, सुशील भोजणे यांनी विशेष मेहनत घेतली.*