ताज्या घडामोडी

आम्ही कोणाचीही फसवणूक केलेली नाही,, आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न_मंदार देशमुख

बदलापूर! लोन काढून देतो असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातला असल्या बाबत मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ठाण्याच्या माजी महापौर विजया खंडेराव देशमुख आणि त्यांचा मुलगा मंदार देशमुख यांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, या बाबत मंदार देशमुख आणि विजया देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी समोर येऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आम्ही कोणाचीही कोणत्याही प्रकारची फसवणूक केली नसल्याचे स्पष्ट केले आहे,लोन काढून देतो असे सांगून मंदार देशमुख आणि त्याची आई विजया खंडेराव देशमुख यांनी ऊल्हासनगर येथिल एका व्यापाऱ्या कडून एक लाख तिस हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सदरच्या व्यापाऱ्यानी ऊल्हासनगर १ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, या बाबत बातमी प्रसिद्ध झाली असल्याने, मंदार देशमुख आणि त्याची आई विजया खंडेराव देशमुख यांनी माध्यमाच्या समोर येऊन,त्यांनी सदर तक्रारदार व्यापारी याची कोणतीही फसवणूक केली नसुन त्यांच्या कडून घेतलेली रक्कम एक लाख तिस हजार रुपये परत केले असल्याचे पुरावे माध्यमांकडे सादर केले आहेत,

देशमुख यांनी दाखवलेल्या दस्तावेजा मध्ये सदर व्यापारी याला त्याची रक्कम परत मिळाली असल्याचे स्वतः तक्रारदार व्यापारी याने अधिकृत दस्तावेज करून लिहुन दिले असल्याचे दिसून येते आहे, परंतु असे असताना देखील आमच्या विरोधात खोट्या अफवा पसरवून आम्हाला बदनाम केले जात असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे, या बाबत सदर व्यापारी यांच्या विरोधात देशमुख यांनी ऊल्हासनगर न्यायालयात खटला दाखल केला असून खोट्या अफवा पसरवून आम्हाला बदनाम करत असल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी न्यायालयात सादर केलेल्या खटल्यात म्हटले आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.