लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीत मोठा फेरबदल,,
ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी नाना शेळके तर ऊल्हासनगर तालुका अध्यक्ष म्हणून संदिप साळवे यांची नियुक्ती

अंबरनाथ! लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या ठाणे जिल्ह्यातील कार्यकारिणी मध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आला असून नुकतीच अंबरनाथ नगरपालिका पत्रकार कक्षात झालेल्या संघटनेच्या बैठकीत ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नानासाहेब शेळके तर ऊल्हासनगर तालुका अध्यक्ष म्हणून संदिप साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
,लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या सहमतीने सदरच्या नियुक्त्या केल्या आहेत, पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले, त्याच प्रमाणे प्रस्थापित व्यवस्था पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी करत असलेल्या खोट्या केसेस या विरोधात पत्रकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना ही सातत्याने कार्यरत असल्याचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी म्हटले आहे,
त्याच प्रमाणे पत्रकारांसाठी,विमा योजना, घरकुल योजना, आणि विविध शासकीय योजना लागू करण्यासाठी सदरची संघटना ही शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे ही या वेळी प्रदेश अध्यक्ष प्रदीप रोकडे यांनी सांगितले, पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत पत्रकार संरक्षण कायदा अधिक मजबूत करुन शासनाने तो तातडीने आमलात आणण्यासाठी आपला संघर्ष सुरूच राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले,
नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष नाना शेळके यांनी पत्रकारांना संपूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी आपण नेहमीच संघर्ष करत संघटनेचे काम अधिक जोमाने वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले,तर ऊल्हासनगर तालुका अध्यक्ष संदीप साळवी यांनी आपण पत्रकारांची संघटनात्मक बांधणी करुन तालुक्यातीलच नाही तर जिल्ह्यातील देखील पत्रकारांना एकत्र आणून पत्रकारांची एक मोठी शक्ती निर्माण करण्याचे आश्वासन दिले
, या वेळी संघटनेचे प्रदेश सचिव श्री भरत कारंडे,संघटक सचिव जगन्नाथ जावळे, सहसचिव संतोष क्षेत्रे, पत्रकार किरण पडवळ, जेष्ठ पत्रकार कमर काझी, यांच्या सह ऊपस्थित सर्वच पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या