दारिद्रयाच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला “कामगार”माझा,दिल्लीचेही तख्त राखितो “महाराष्ट्र” माझा.!
( तात्यासाहेब सोनवणे यांजकडून ०१मे महाराष्ट्र दिन विशेष)

राकट, कणखर, महाराष्ट्र बलशाली महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीची हीरकमहोत्सवी वाटचाल,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले “मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण,”:यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा “मंगलकलश” महाराष्ट्रात आणला. हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीच्या धावला.!संपादक,साहित्यशिरोमणी,प्र.के.अत्रे, यांच्या प्रभावी भाषणाने,ना.स.का.पाटील,नासका पाटील,चव्हाणांमघले ‘च’ काढल्यावर वहाण राहिल. असे विडंबनात्मक बोलून मैदाने गाजवली.भाऊच्या धक्क्यापासून दिल्लीच्या श्रमिकांच्या भाळावरचा जाहिरनामा साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे, पद्मश्री नारायण दादा सुर्य,अमर शेख,गंगावणकर,यांनी लाल बावटा कलापथकातून संगर मांडला.१०५ हुतात्मे झाले.तेव्हा ०१ मे१९६० महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.त्यानंतर मारोतराव कन्नमवार, बाळासाहेब सावंत, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बॅ. अब्दुल अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे, यांनी महाराष्ट्र राज्याची धुरा सांभाळली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्या सत्तेवर आहेत.माहिती तंत्रज्ञान आले. नवनवीन उद्योग समूह महाराष्ट्रात आले,कृषी विद्यापीठ उभे राहिले.हरितक्रांती म्हणावी तशी झाली नाही. साखरसम्राट ,शिक्षण सम्राटांनी,शाळा काॅलेज,अभियांत्रीकी महाविद्यालय ताब्यात घेतले.औद्योगिक विकास योजना राबल्या ख-या पण, असंघटीत कामगार, मग बांधकाम क्षेत्र, असो, मच्छिमार असो, वीटभट्टी कामगार असो, उसतोडणी मजूर असो, माथाडी कामगार,कापडगिरणी कामगारअसो, खाणकामगार,बिगारी नाका कामगार,यांच्या जगण्यात फारसा फरक पडला नाही. वन नेशन – वन रेशन, कायदा आला, पण स्थलांतरित मजूरांचे काय? कामगार, इस. सन. १९६० ते १९८० चा काळ, वेतन, महागाई भत्ता,बोनस,या कामगारांच्या न्यायहक्कांसाठी कामगार संघटना उभ्या राहिल्या.लोकाधिकार समिती उभी राहिली. जाॅर्ज फर्नांडिस, गोविंदराव अदिक, दादा सांमत,बाबा आ़ढाव,वढावकर, सुर्यकांत महाडीक, सचिन भाऊ अहिर,भाई जगताप,नरेंद्र पाटील,चंद्रशेखर राव, कांबळे,गोवर्धन भगत,राजााराम साळवी,शामदादा गायकवाड, शरददादा म्हात्रे, आशा कामगार नेत्यांनी आपल्या पध्दतीने काम केले.ठाणे जिल्ह्यातील, कल्याण,डोंबिवली,अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक वसाहती मध्ये कामगार नेते दादासाहेब पाटील यांनी स्वतंत्र कामगार चळवळ अर्थात महाराष्ट्र मजदूर सभेच्या माध्यमातून भरीव कार्य केले.कामगारांसाठी कामगार आयुक्तांना जाब विचारला.काही भांडवलशाही मालकांविरूध्द कोर्टात केसेसही चालवल्या.मालक अन् कामगार यांच्यातला दुवा म्हणून कामगार नेत्याकडे पाहिले जायचे ,काहीनी कामगारांना न्याय दिला,पण काही कामगार नेते, आमदार,खासदार,नामदार झाले.काही मालक धार्जिणे झाले.खटके उडून,कोहिनूर, कमला मिल,मर्फी रेडिओ, एचएमटी,भारत गियर,प्रिमीयर,सेंचुरी,खटाव, स्वस्तीक, पिरामल,विम्को,भूषण स्टील,कोकण केमीकल,अपोलो पेन्सिल,सायकल कंपनी,इंडो ग्लास, लिब्रा,ठाणे,वागळे इस्टेट बेलापूर,रायगड मधील मोठ्या कंपन्या बंद पडल्या.असंघटीत कामगारांच्या स्वतंत्र कामगार संघटना उभ्या राहिल्या ख-या, पण जागतिकरण आणि कंत्राटी कामगार, पध्दतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला.संविधानात कामगार कायदे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर मंत्री असताना पुढच्या भावी पिढीलाही दिशा दिली. महिलांना प्रसुती रजा, कामाचे आठ तास असावे, पी. एफ्. ईएसआयसी, रासायनिक उत्पादन बनवणाऱ्या,केमिकल्स कंपन्या मध्ये सुरक्षा एक्युपमेंट, बूट, गाॅगल्स,हॅन्डग्लोजची वाणवा असते.मेडिकल सुविधा मिळाव्यात म्हणून, स्वतंत्र कामगार मंत्रालय उभे राहिले.कामगार आयुक्तालय निर्माण केले.पण आजही म्हणावे असे वेतन, व सुविधा मिळत नाहीत. त्यांची कायम उपेक्षा आजही सुरू आहे. मल्टी नॅशनल,प्रायव्हेट,क्षेत्रात अॅडमिनीस्ट्रेशन डिपार्टमेंट आले खरे पण बरेच निर्णय वातानुकूलित अॅन्टीचेंबर मध्येच ठराविक लोकात आजही होतात.लघुद्योगातही काही कंपन्या कामगारातला एखादा “चमचा” गोंडा घोळणारा हेरतात,त्याला आर्थिक पाठबळ देवून आपले इप्सित साधून घेतात. त्याचे पोट भरले म्हणजे बाकीच्यांचे भरले का? हा वास्तव प्रश्न अनुत्तरित रहातो.कामगारांची अवस्था मेंढरांसारखी. सारे काही “चमचा” म्हणेल तसेच मालक का वागतात?आजही खाजगी सर्रास खाजगी क्षेत्रात सुरू आहे.आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करतोय,महाराष्ट्र दिनाचा हीरक महोत्सव, शासकीय, निमशासकीय, सामाजिक संस्था, विकास सोसाट्याच्या कार्यालयावर तिरंगा डौलाने फडकेल.छत्रपती शिवाजी महाराज,मानवमुक्तीचे प्रणेते भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घातले जातील.हुतात्मा चौकात अभिवादन होईल. मंत्रालय, जिल्ह्यांच्या मुख्यालयासमोर ध्वजसंचलन होईल. शासनाचे प्रमुख मानवंदना स्वीकारतील, महाराष्ट्र राज्यातील जनतेला, बळीराजाला,उद्देशून भाषण करतील, आश्वासने देतील. समर्थक टाळ्या पिटतील.तद्नंतर प्रसिद्धी माध्यमांना बाईट देतील. विरोधक त्यांची आश्वासने खोडून टाकतील. कार्पोरेट क्षेत्रातील आपल्याला काय देणें नाही म्हणून, गोवा, सिमला,महाबळेश्वरला फिरायला जातील.! सुट्टीचा दिवस आहे म्हणून काही घरात थांबतील. भाबडी जनता,सुशिक्षीत बेरोजगार कामगार रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल शोधत नव्या संधीच्या शोधात वणवण भटकतील.! राज्यकर्ते मंगल देशा पवित्र देशा “महाराष्ट्र देशा”, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.! आम्हाला राष्ट्रभक्तीचे बूस्टर डोस पाजत राहतील. महागाई, बेरोजगारी, आग ओकत राहिल.शेतकरी, शेतमजूर,कामगार आकाशवाणी वरील जुने गाणे शोधत राहिल.संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या लढयातली लावणी, माझी मैना गावावर राहिली..माझ्या जिवाची होते काहिली. “श्रमिक”, हो घ्या इथे विश्रांती..! एक मात्र खरं ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या तळव्यांवर तरली आहे. दारिद्रयाच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला “कामगार” माझा, दिल्लीचेही तख्त राखितो “महाराष्ट्र” माझा.! जय महाराष्ट्र.!