धम्म जीवन जगण्याचे शास्त्र सांगणारा धम्माचे चक्र गतिमान करणारा सम्राट सुद्धा जगाला समजणे गरजेचे आहे – वेदांत मोरे

दि. 29/03/2023 रोजी प्रियदर्शी ,चक्रवर्ती राजा,जगजेता,विश्वविजेता,मागधराज ,देवनाम प्रिय,महान मौर्य शाशक,धम्मशासक सम्राट अशोक ह्याची चैत्र शुल्क अष्टमी 2327 व्या जयंती निमित्त श्रावस्ती बुद्ध विहार समिती ट्रस्ट ह्यांचा मार्फत रमाबाई आंबेडकर हायवे ठाणे इथे जयंती मोठ्या आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली आणि चक्रवर्ती अशोक राजा ची राज्यकीर्ती जण माणसात पोहचविण्याची नवीन संकल्प करण्यात आला
.संघर्ष वार्ता वृत्तवाहिनीचे संपादक साईनाथ खरात ह्यांनी सुद्धा महत्वाची उपस्तिथी कार्यक्रमाला दर्शवली,ह्या कार्यक्रमात तरुण पिढी चा फार सहयोग दिसून आला आणि वेदांत मोरे ह्यांनी संवाद साधून तरुणांना संबोधित करून जंबुदिप आणि मौर्य साम्राज्य शासन प्रणाली हा विषय सादर केला. सत्यशोधक मैत्रीय संघ देखील कार्यक्रमात उपस्थित राहून शोभा वाढवली आणि 16 एप्रिल च्या कार्यक्रमाची प्रत प्रकाशित करण्यात आली कार्यक्रमाचे अयोजन राणी अरकडे ,रुपेश तुपारे,तुषार शिंदे ,सुमित आठवे,देव धारवडकर ,प्रेम सोनवणे ,कुणाल वाघमारे ह्यांनी कार्यक्रम यशस्वी केला .