निस्वार्थ सेवादायी सामाजिक विचार चॅरिटेबल ट्रस्ट ची आंबेवाडी ला निस्वार्थ सेवा….

अंबरनाथ येथील जावसई परिसरात नावलौकिक झालेल्या आदिवासी पाड्यातील आंबेवाडी हे नाव सामाजिक संस्थांच्या भेटीचे आवडीचे केंद्रस्थान बनले आहे…
भटके विमुक्त सामाजिक संस्था अंतर्गत निस्वार्थ सेवादायी सामाजिक विचार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने अंबरनाथ येथील आदिवासी पाड्यातील आंबेवाडी या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 21 जानेवारी2024 रोजी आंबेवाडीतील आदिवासी विद्यार्थ्यांना व महिलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी शिक्षणाकडे वळावे असे मार्गदर्शनही करण्यात आले.
यावेळी निस्वार्थ सेवादायी सामाजिक विचार चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शशांक कासारे, खजिनदार सुजित वासनिक, सचिव प्रमोद महाले, अमित चिंचखडे, सुहास सुद्रिक, विनोद शिंदे, अविनाश हातेकर ,रुपेश नागपुरे, शितलताई, रोहिणी गायकवाड, प्रमोद गायकवाड, सुरेश चव्हाण ,राज डांगे व भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदरलाल डांगे व आंबेवाडी तील सर्व महिला व नागरीक उपस्थित होते…
अशी माहिती संस्थेचे सचिव मनी डांगे यांनी दिली