ढोके दापिवली येथे आयोजित मुळगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२४ भव्य दिव्य आयोजनातून उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.
दि.०३ जानेवारी २०२४

*क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन व स्त्री मुक्ती दिनानिमित्त भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन मुळगाव केंद्रातील ढोके दापिवली शाळेच्या भव्य प्रांगणात केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.*
कार्यक्रम प्रारंभी राष्ट्रगीत घेण्यात आले.
बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.प्रतिमापूजन गृपग्रामपंचायत ढोके दापिवली व आंबेशिव खुर्द च्या सरपंच सन्माननीय सौ.पूजाताई सचिन गायकर,मा.सरपंच सौ.माधुरीताई भोईर,मा.सरपंच
श्री.योगेशभाऊ भोईर,सदस्या सौ.योगिताताई सवार, ग्रामसेविका सौ.अरुणा सिंगासने मॕडम,केंद्रप्रमुख श्री.गणेश जाधव सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.चंद्राताई रविंद्र भोईर, समाजसेवक श्री.सचिनदादा गायकर (मंडप व सांऊड सिस्टीम उपलब्धता),मा.उपसरपंच श्री.भानुदासदादा गायकर, उपाध्यक्ष श्री.सुनिल गायकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वांना सामुदायिक स्वच्छता शपथ देण्यात आली.उपस्थित सर्वांना स्वच्छता शपथ आघाणवाडी शाळेच्या प्राथमिक शिक्षिका सौ.चारुशिला भामरे मॕडम यांनी दिली.
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ मैदानात बालक्रिडापट्टूंच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित व फिरवून करण्यात आली.
त्यानंतर क्रीडा नियोजक श्री.ज्ञानेश्वर सोळंकी सरांनी क्रीडा स्पर्धेकरिता दाखल सर्व विद्यार्थ्यांना सामुदायिकरित्या क्रीडा शपथ दिली.
उपस्थित सर्वांचे स्वागत केंद्रप्रमुख श्री.गणेश जाधव सर, मुख्याध्यापक श्री.शंकर झाडबुके सर, सेवाजेष्ठ शिक्षक श्री.पांडुरंग पाटील सर यांनी केले
.
क्रीडा स्पर्धेत संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन शेरोशायरी ने यशस्वीपणे करण्याची कामगिरी नवोपक्रमशिल प्राथमिक शिक्षक श्री.आनंद सोनकांबळे सर यांनी केले.
केंद्रीय मुख्याध्यापक श्री.अर्जून गाजरे सर व सेवाजेष्ठ शिक्षक श्री.पांडुरंग पाटील सर यांनी क्रीडाप्रकार नुसार लाॕटस पाडले.
सन्माननीय सरपंच सौ.पूजाताई गायकर,श्री.योगेश भोईर (मा.सरपंच),शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा
सौ.चंद्राताई भोईर व केंद्रप्रमुख श्री.गणेश जाधव सर यांच्या हस्ते मैदानात नारळ फोड, नाणेफेक व खेळाडूंना जिंकण्यासाठी शुभेच्छा देत क्रीडा स्पर्धेच्या खो-खो, कबड्डी व लंगडी या क्रीडा स्पर्धेला प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला.
यावेळी क्रीडाप्रेमींनी विद्यार्थ्यांच्यातील क्रीडाकौशल्य,खेळण्यातील चपळता,चित्तथरारक खेळातील डावपेच प्रसंग इ.ची दृश्य टिपण्यासाठी एकच झुंबड गर्दी केली होती.
मैदानावरील खेळाचे समालोचन श्री.झाडबुके सर,श्री.सोळंखी सर, श्री.गाजरे सर तसेच केंद्रप्रमुख श्री.गणेश जाधव सर व श्री.आनंद सोनकांबळे सर यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.
क्रीडा स्पर्धेकरिता आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी, शिक्षक व विद्यार्थी इ.सर्वांसाठी ढोके दापिवलीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेत भोजनाची उत्कृष्ट व.व्यवस्था केली होती.याकामी आपली
अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे आपली कर्तव्यनिष्ठा बजावण्याचे काम प्रामुख्याने गावचे माजी उपसरपंच श्री.भानुदासदादा गायकर, सौ.ज्योतीताई गणेश गायकर, समाजसेवक श्री.गणेश सवार,सौ.राजश्री राजाराम गायकर,श्री.सुनिल गायकर, सौ.उषाताई दिपक गायकर,सौ.योगिताताई गायकर, सौ.चंद्राताई भोईर,श्री.दिनेश गायकर,श्री.उल्हास गायकर,गावचे तरुण युवा मंडळ इ.नी आलेल्या सर्वांना सुग्रास भोजन देण्यात व कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.
याकामी सढळ हस्ते आर्थिक योगदानही दिले.गावचे पोलीस पाटील श्री.गणेशदादा गायकर, श्री.सचिनदादा गायकर,श्री.सुनिल गायकर यांचे विशेष योगदान लाभले.गावच्या युवा मंडळाने मैदानाला पाणी मारणे,मैदान आखणे इ.कामी आपले योगदान दिले.
दुखापत झालेल्या खेळाडूंसाठी औषधोपचाराची चोख व्यवस्था केली होती.खेळांडूसाठी खेळांतील मध्यंतरी लिमलेटच्या गोळ्यांची ही व्यवस्था केली होती.
क्रीडा स्पर्धेत अंबरनाथ जनमत वार्ता वृत्तपत्राचे संपादक श्री.पांडुरंग रानडे साहेब यांची उपस्थिती लाभली.
खो-खो,लंगडी,कबड्डी,लांब उडी, धावणे,रिले शर्यत,संगीत खू्र्ची, लेझिम नृत्य इ.क्रीडा स्पर्धा प्रकारांचे पंच, गुणलेखक व वेळाधिकारी म्हणून केंद्रातील शिक्षकांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी चोखपद्धतीने बजावली व क्रीडा स्पर्धा निकोप व निःपक्षपातीपणे भूमिका घेत यशस्वी केली.
या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळाचे नियम पाळत उत्कृष्ट खिलाडूवृत्ती दाखवित खेळातील क्रीडानिपुणता दाखवून दिली.
*क्रीडा स्पर्धा समारोप प्रसंगी विजयी शाळा व विजयी स्पर्धकांना ट्राॕफी,मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.
जिंकलेल्या खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यासाठी मान्यवर अतिथी गृपग्रामपंचायत ढोके दापिवली व आंबेशिव खुर्द च्या सरपंच सौ.पूजाताई गायकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.चंद्राताई भोईर, मा.उपाध्यक्ष श्री.सुनिल गायकर, मा.उपसरपंच श्री.भानुदासदादा गायकर,केंद्रप्रमुख श्री.गणेश जाधव सर,मुख्याध्यापक श्री.शंकर झाडबुके सर,आंबेशिव बु.च्या मुख्याध्यापक सौ.हेमलता पाटील मॕडम,केंद्रीय मुख्याध्यापक श्री.अर्जुन गाजरे सर इ.च्या शुभहस्ते वितरण करण्यात आले.
सरते शेवटी सर्वांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल शतशः धन्यवाद मानण्यात आले.
वंदे मातरम् घेऊन क्रीडा स्पर्धेची सांगता करण्यात आली.