ताज्या घडामोडी

अंबरनाथ !! कॉंग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभाग शहर अध्यक्ष पदी पुन्हा एकदा माजी नगरसेवक आत्माराम तांबे यांची निवड,,,

पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत कारंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र,,

अंबरनाथ शहर कॉंग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष पदी पुन्हा एकदा माजी नगरसेवक आत्माराम तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, कॉंग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत कारंडे यांनी अंबरनाथ शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत आत्माराम तांबे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार केला

,

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष भरत कारंडे यांनी ठाणे जिल्हाची मोर्चे बांधणी सुरू केली असून,ठाणे जिल्ह्यातील सर्व समाजातील वंचित घटकांना बरोबर घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वांना कॉंग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आणून ठाणे जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाची एक मोठी ताकद आपण निर्माण करणार असल्याचे भरत कारंडे यांनी बोलताना सांगितले, या मुळे काहिच महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला याचा फार मोठा फायदा होणार असुन अनुसूचित जाती विभागाच्या माध्यमातून निवडणुकीत मिळाणारे मतदान हे कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी निर्णायक ठरणार असल्याचेही भरत कारंडे यांनी म्हटले आहे.या प्रसंगी बदलापुर शहर आणि अंबरनाथ शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.