मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ नामकरण समिती लवकरच घेणार भेट.

नाशिक(प्रतिनिधी):- कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड विमानतळ (ओझर)नामकरण समिती नाशिकच्या वतीने समितीचे मुख्य निमंत्रक अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अण्णासाहेब कटारे यांनी बोलतांना सांगितले की,नुकतेच देशातील 13 विमानतळाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाले आहे नाशिक ओझर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नामकरणाचा प्रस्ताव अजूनही प्रलंबित असल्याने समितीच्या वतीने लवकरच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस* यांची समक्ष भेट घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव पारित करण्याबाबत समितीच्या वतीने मागणीनामा तथा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे,
*बैठकीस मुख्य निमंत्रक अण्णासाहेब कटारे,बाळासाहेबजी शिंदे,मदन अण्णा शिंदे,भारत नाना पुजारी,आदेश भाऊ पगारे,दिपचंद नाना दोंदे,दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र जी गायकवाड,भिवानंद आप्पा काळे,सनी भाई रोकडे,पत्रकार अनिल जी आठवले,दिलीप जी प्रधान,भय्यासाहेब गायकवाड,राजा भाऊ गांगुर्डे,पंडित जी नेटावटे,बिपीन कटारे, प्रतीक भाऊ सोनटक्के,धम्मपाल वाहुळे,कुणाल बाळासाहेब गांगुर्डे,अनंत बस्ते,सदाशिव दिवेकर,प्रकाश खडताळे, संजय हिवाळे,अनिल जाधव* आदी उपस्थित होते.