बदलापूर पश्चिम बाजारपेठेतील अनाधिकृत गाळ्यांवर दिनांक 28 आक्टोंबर २०२२ रोजी होणार कारवाई,,
मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांनी काढले अतिक्रमण हटवण्याचे आदेश,लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचा दणका

बदलापूर !! कुळगाव बदलापुर पश्चिम बाजारपेठेत बांधण्यात आलेल्या अनाधिकृत गाळ्यांवर कारवाई करणेसाठी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, बदलापुर नगरपालिकेने तातडीने कारवाई न केल्यास येत्या १ नोव्हेंबर २०२२ पासून नगरपालिका कार्यालया समोर बेमुदत लाक्षणिक साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहे, बदलापुर पश्चिम बाजार पेठ हा अतिशय गजबजलेला परिसर असून, काही व्यापाऱ्यांनी शहरातील काही राजकीय बड्या नेत्यांच्या आर्शिवादाने आणि पालिका प्रशासनाच्या अधिका-यांशी हात मिळवणी करून कोणतीही परवानगी न घेता तळ मजला + १ असे बेकायदेशीर गाळे बांधले आहेत, सदरची जागा ही विकास आराखड्यात बाधित झालेली असुन,जागा मालकांना त्या बाबत योग्य तो मोबदला देण्याचे प्रस्तावित आहे, परंतु काही व्यापाऱ्यांनी राजकीय लोकप्रतिनिधी यांना हाताशी धरून शासनाच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे, या पुर्वी देखील पालिका प्रशासनाने अनेक वेळा अतिक्रमणाची कारवाई करुन लाखो रुपये खर्ची घातले आहेत,लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने सदरचे अनाधिकृत बांधकाम सुरू असताना पालिका प्रशासनाला सावध भूमिका घेण्यासाठी निवेदन सादर केले होते परंतु पालिका प्रशासनाने या कडे जाणुनबुजून दुर्लक्ष करत या अनाधिकृत बांधकामाला पाठीशी घालण्याचे काम केले आहे, या मुळे संघटनेने आक्रमक भूमिका घेत सदर बेकायदेशीर अनाधिकृत गाळ्यांवर कारवाई न झाल्यास दिनांक एक नोव्हेंबरपासून बेमुदत लाक्षणिक साखळी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे, या बाबत मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांनी तातडीने दखल घेऊन दिनांक २८ आक्टोंबर रोजी या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत,