आरोग्य व शिक्षण

डोळखांब विभागातील वंचित घटकातील विद्यार्थांना सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद वतीने शालेय लेखन साहित्य वाटप*

*सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेचे वतीने आज दिनांक 19/10/2022 रोजी दुसर्‍या टप्प्यातील शाहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हापरिषद शाळा वरपडी, जिल्हापरिषद शाळा बनाची वाडी व जिल्हापरिषद शाळा साकुर्ली येथील तीन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य (वह्या, पेन, पेन्सिल,पट्टी, खोडरबर, शाॅपनर) व खाऊ वाटप करण्यात आले*

यावेळी संस्थेचे सरचिटणीस जगदिश गायकवाड सर, उपाध्यक्ष बळीराम गायकवाड, कोषाध्यक्ष होमराज शेंडे,माजी कोषाध्यक्ष रत्नदीप शिवगण यांनी विशेष मेहनत घेऊन नियोजन बद्ध साहित्य वाटप केले.


तसेच वारंगुळेसर, बाळूगुंड सर,घोडकेसर, संजय घुलेसर ,नखाते सर,शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्षा साकुर्ली मा.शेख मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.
*संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड सर यांनी माहिती देताना सांगितले की,वंचित घटकातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेने हा खारीचा वाटा उचललेला आहे.लेखन साहित्य अभावी वंचित विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये ही अपेक्षा आहे.दिवाळी सुट्टी नंतर आणखी तिसऱ्या टप्प्यात आम्ही गरजू विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप करणार आहोत.या शैक्षणिक उपक्रमाला समाजातून छान प्रतिसाद मिळत आहे*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.