जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळेत गुरूपोर्णिमा आनंदात उत्साहात संपन्न

बुधवार दिनांक 13 जुलै 2022 रोजी जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,केंद्र कोशिंबी,ता.भिवंडी,जि.ठाणे येथे सकाळी 11-30 वाजता आषाढ पोर्णिमा अर्थातच गुरूपोर्णिमेचं आयोजन करण्यात आले.
सर्व प्रथम महाराष्ट्राचे महाराजे ,अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ,भारतीय संविधान निर्माते महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, स्त्री उद्धारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला सहशिक्षिका दिलशाद शेख, सहशिक्षक अशोक गायकवाड, विद्यार्थीनी उषा हरड यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी गुरूपोर्णिमेचा इतिहास व महत्त्व या विषयावर अनेक उदाहरण देऊन उद्बोधनपर मार्गदर्शन केले
विद्यार्थ्यांनी परिसरातील पाने फुलांपासून पुष्पगुच्छ तयार करून गुरूपोर्णिमे निमित्त आपल्या गुरूंना भेट देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.
सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी सर्व विद्यार्थांना चाॅकलेट देऊन तोंड गोड कले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.