एस एस टी महाविद्यालयात साजरा करण्यात आला बँक राष्ट्रीयीकरण दिन*

उल्हासनगर ४ मधील एस एस टी महाविद्यालयाच्या बँकिंग अँड इन्शुरन्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी बँक राष्ट्रीयीकरण दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात मॉक बँक स्थापन करण्यापासून ते बँक कशी चालवली जाते, बँकर्स आणि खातेदार काय प्रक्रिया करतात हे दर्शविणारे अतिशय प्रभावी सादरीकरण करण्यात आले. बँकेची भूमिका, कर्ज कसे दिले जाते,शेतकऱ्यांसाठी कर्ज आणि योजना, शैक्षणिक कर्ज, कॉर्पोरेट कर्ज तसेच त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, फॉर्म भरण्याची प्रक्रिया इत्यादी बाबी वर ऍक्ट ऑन मॉक बँक (Mock Bank) द्वारे प्रकाश टाकण्यात आला.तसेच इशा शेळके या विद्यार्थिनीने बँकांचे राष्ट्रीयीकीकरण का करण्यात आले याविषयी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन दिले.यावेळी विद्यार्थ्यांनी बँकेत वापरण्यात येणाऱ्या विविध मशीनीचे उत्कृष्ट मॉडेल तयार केले होते
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पुरस्वानी,बँकिंग ऍण्ड इन्शुरन्स विभागाच्या समन्वयक प्रा.दीपिका वलेचा,बी ए एम एम सी विभाग प्रमुख प्रा.दीपक गवादे आणि इतर शिक्षक ही उपस्थित होते.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली आयोजित केलेला कार्यक्रम.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिया गुप्ता, प्रथम भालेराव,सागर वाघमारे, विजय बोकोलीया,शुभम खुशवाह,साहिल कश्यप, अमृता कुंभार,कुमुद फुले ,अक्षय गवनाग,तेजल सोनकांबळे, अनिल सोनकांबळे आणि इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.