ताज्या घडामोडी

कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडून यावर्षीच्या श्री गणेशोत्सवासाठी सार्व.गणेश मंडळाना मंडप शुल्क माफ आणि फायर शुल्कामध्ये ५०%टक्के सूट,,,,

यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाले असले तरीही सर्व खबरदारी घेऊनच श्री. गणेशोत्सवाचे आयोजन करावे,या वर्षी सार्वजनिक श्री गणेशोत्सवासाठी गणेश मंडळाना मंडप शुल्क माफ राहील आणि फायर शुल्कावर५०%टक्के सूट दिली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज दिली.

यावर्षीच्या श्री गणेशोत्सवासंदर्भात महापालिका मुख्यालयात आज संपन्न झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. सदर बैठकीस पोलिस उपआयुक्त सचिन गुंजाळ, अतिरिक्त आयुक्त पवार,शहर अभियंता महापालिका सचिव, महापालिकेचे उपायुक्त, कल्याणचे सहा पोलिस आयुक्त वाहतूकीचे सहा. पोलिस आयुक्त, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,महापालिकेचे सहा.आयुक्त,बाजारपेठ, महात्माफुले,कोळसेवाडी, खडकपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक,सार्वजनिक श्री गणेशोत्सव मेळा संघाचे विश्वस्त,अखिल सार्व.श्री गणेशोत्सव महासंघाचे पदाधिकारी हे प्रत्यक्ष व-८३ सार्व.गणेशोत्सव मंडळे दुरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव सर्वत्र साजरा केला जावा तसेच श्री गणेशोत्सवापूर्वी पावसाने उघडीप दिल्यावर रस्त्यावरील खड्डे महापालिकेतर्फे बुजविले जातील.मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करुनच गणेशोत्सव साजरा करावा,असे आवाहन महापालिका प्रशासकीय आयुक्त डॉ.दांगडे यांनी यावेळी केले.श्री गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात एक खिडकी योजना राबिवली जाईल त्याप्रमाणे या वर्षीच्या श्री गणेशोत्सवासाठी ऑन कॉल विसर्जन आणि विसर्जन आपल्या दारी या संकल्पना महापालिकेमार्फत राबिवल्या जातील. यावर्षीच्या श्री गणेशोत्सवासाठी
श्री गणेश विसर्जनाकरिता नागरिकांच्या सोयीसाठी ६७-जनरेटर-२४५५ हॅलोजन-८८-टॉवर-१६८ सीसी टिव्ही कॅमेरे यांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली.

यावर्षी पोलिस परवानगी साठी कोणालाही व्यक्तीश: पोलिस स्टेशनला येऊन परवानगी घ्यावी लागणार नाही.सिटीजन पोर्टल या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन परवानगी देण्यात येणार आहे.
श्री गणेश मुर्तीची पूर्ण जबाबदारी मंडळाची राहील. पोलिसांचे पथक वेळोवेळी मंडळांची पाहणी करतील अशी माहिती परिमंडळ-०३-चे उपआयुक्त सचिन गुंजाळ यांनी यावेळी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.