आरोग्य व शिक्षण

बोगस डॉक्टर कारवाई बाबत *ग्राहक कल्याण फौंडेशन ने घेतली जिल्हाधिकारी यांची भेट*

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर केली कारवाई ची मागणी

सोलापूर (प्रतिनिधी ) रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर जिल्हा आरोग्य विभाग यांचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसताना देखील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मोहोळ बार्शी पंढरपूर नवीन विडी घरकुल तळे हिप्परगा कुरुल कामती बोरामणी या ठिकाणी कोणतीही वैद्यकीय पात्रता नसलेले बोगस डॉक्टर बिनदिक्कीत पणे आपला वैद्यकीय व्यवसाय करत असून या भागातील रुग्णावर उपचार करत आहेत अशा बोगस डॉक्टर मुळे रुगांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखाद्याचा प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वेळीच अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असताना जिल्हा आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर अशा बोगस डॉक्टर वर कोणतीच कारवाई करत नसल्याने जिल्हा आरोग्य विभागाचे नियम पायदळी तुडवून हेच बोगस डॉक्टर आपला वैद्यकीय व्यवसाय वर्षानुवर्षे थाटून बसले आहेत गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टर ची फी परवडत नसल्याने व बोगस डॉक्टर अतिशय कमी पैशात उपचार करत असल्याने रुग्ण अश्या बोगस डॉक्टर कढून उपचार करून घेतात तसेच अश्या बोगस डॉक्टर ची वैद्यकीय पात्रता विषयी अधिक माहिती नसल्याने बोगस डॉक्टरकडे उपचार करून घेत आहेत वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर अंकुश ठेवण्याचे काम किंवा कारवाई करण्याचे काम जिल्हा आरोग्य विभाग करत नसल्याने सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हेच बोगस डॉक्टर उघडपणे आपला व्यवसाय करत असल्याने सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी वाढली आहे सोलापूर जिल्हा बोगस डॉक्टर मुक्त होण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोणतेही प्रयत्न न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यात यावी म्हणून
*ग्राहक कल्याण फौंडेशन चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी मा जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिनांक 2/6/2022 रोजी लेखी पत्र देऊन कारवाई ची मागणी केली होती*
*जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली*
सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करा म्हणून ग्राहक कल्याण फाउंडेशनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे मागणी केली होती त्याच अनुषंगाने मा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना दिनांक 7/6/2022 रोजी क्र साश / संकीर्ण 2 ब आर आर 684 पत्र देण्यात आले होते
परंतु दोन महिने उलटून देखील जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्रावर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कोणतीही कारवाई केलेली नाही उलट जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे
*मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मौन का*?
सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर जिल्हा आरोग्य अधिकारी कारवाई करत नसल्याने ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिनांक 11/7/2022 रोजी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती स्वच्छ प्रशासन गतिमान प्रशासन जिल्हा परिषदेचा कारभार अतिशय उत्तमपणे सांभाळणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर अंकुश ठेवू शकले नाहीत त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर देखील कोणतीच कारवाई करत नसल्याने सोलापूर जिल्हातील बोगस डॉक्टर कारवाई बाबत जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी मौन बाळगले असून लेखी पत्र देऊन एक महिना झाला तरी अद्याप कोणतीच कारवाई नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे
*तालुका वैद्यकीय अधिकारी व बोगस डॉक्टर यांचे आर्थिक संबंध*?
सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर का कारवाई करण्यात यावी म्हणून ग्राहक कल्याण फाउंडेशनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी वेळोवेळी लेखी तक्रारी करून देखील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुक्यातील कोणत्याही बोगस डॉक्टर कारवाई केली नसल्याने बोगस डॉक्टर व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यात अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा रंगली असून तालुक्यातील बोगस डॉक्टर माहिती असून देखील तालुका वैद्यकीय अधिकारी कोणतीच कारवाई करत नसल्याने बोगस डॉक्टरांचे फावले असून अर्थपूर्ण संबंध मुळे तालुक्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात येत नाही अशी देखील चर्चा आहे चुकीच्या उपचारामुळे कोणाचा तरी जीव गेल्यानंतरच तालुका वैद्यकीय अधिकारी बोगस डॉक्टर वर कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे
*बोगस डॉक्टर कारवाई बाबत ग्राहक कल्याण फौंडेशन आमदार खासदार यांना देणार निवेदने*
सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर व कारवाई करण्यात यावी म्हणून ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना वेळोवेळी लेखी पत्रे व निवेदने देऊन देखील सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर अद्याप कोणतीच कारवाई न केल्याने ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर बाबत आमदार खासदार यांना लेखी निवेदन देऊन सोलापूर जिल्हा बोगस डॉक्टर मुक्त करण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती ग्राहक कल्याण फाउंडेशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे
*बोगस डॉक्टर कारवाई बाबत जिल्हाधिकारी यांना स्मरणपत्र*
सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई बाबत मा जिल्हाधिकारी सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना वेळोवेळी निवेदने देऊन देखील अद्याप सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याच बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून ग्राहक कल्याण फाउंडेशन वतीने सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यात यावी म्हणून उपजिल्हाधिकारी सोलापूर यांची भेट घेऊन स्मरण पत्र सादर करण्यात आले आहे यावेळी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार सिद्धार्थ भडकुंबे दत्तात्रय धनके हरी भिसे अक्षय बबलाद रोहित घोडके इत्यादी उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.