राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ११ संप्टेंबर २०२२ रोजी मुंबई मध्ये भव्य राज्यव्यापी अधिवेशन

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २४ जुलै २०२२ रोजी मुंबई बांद्रा कलानगर येथिल शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली, आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषदा नगरपंचायत निवडणुका बाबत या वेळी चर्चा करण्यात आली, सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी ध्येय धोरणे आखण्यासाठी सदरची बैठक बोलवण्यात आली होती, मुंबई प्रदेश अध्यक्ष अशोकराव भोगले यांनी सदरच्या बैठकीचे आयोजन केले होते, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा विस्तार हा झपाट्याने होत असुन राज्यातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे भव्य राज्यव्यापी अधिवेशन दिनांक ११ संप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती युवा आघाडीचे नेते बिपिन कटारे यांनी दिली आहे,
या वेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश सचिव पदी बाबासाहेब खरात यांची नियुक्ती करण्यात आली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते बाबासाहेब खरात यांना नियुक्ती पत्र देण्यात आले,आपण पक्ष संघटना वाढीसाठी जोमाने वाटचाल करणार असल्याचे आश्वासन बाबासाहेब खरात यांनी नियुक्ती स्विकारताना सांगितले, या वेळी, राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयराज पगारे, केंद्रीय महासचिव पोपटराव सोनावणे, मुंबई प्रदेश महासचिव सचिन नांगरे, मुंबई उपाध्यक्ष मंगलभाई शेख, प्रशांत कटारे, मुंबई नाका सेलचे सागरभाई पिल्ले, मुंबई रिक्षा युनियनचे मेहमूद शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होते