क्राईम

ओएलएक्सवर गाडी खरेदी करताय? सावधान,, होऊ शकते मोठी फसवणूक

नेमका लोकांना कसागंडा घातला जातोय याची मोड्स ऑपरेंडीही समोर आली आहे

पुणे:- ओएलएक्सवरुन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, सावधान! कारण पुण्यात कार विक्रीला ठेवून सहा लाख रुपयांची चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी सनी अनिल दाते याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जातेय. त्यांनी अनेकांची फसवणूक केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सनी दाते प्रमाणे अनेकांकडून ओएलएक्सवर गाड्या ठेवून लोकांना गंडवण्याचे प्रकार केले जातात. त्यामुळे लोकांनाही सतर्क राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. तर दुसरीकडे ओएलएक्सवर नेमका लोकांचा कसा गंडा घातला जातोय, याची मोड्स ऑपरेंडीही समोर आली आहे. या चोराला पकडताना पोलिसांनी नेमकं कसं जाळं तयार केलं, त्यावरुन या सगळ्याचा अंदाज येऊ शकतो.

नेमकं_काय_घडलं?

मिलिंद मधुकर गुंजाळ, वय ३२ वर्षे, धंदा नोकरी रा. संगमनेर जि. अहमदनगर यांनी चाकण पोलीस स्टेशन तक्रार नोंदवली होती. सनी अनिल दाते रा. पाषाण पुणे याने ओएलएक्स अपवर मारूती सुझुकी ब्रिझा कार नंबर एम एच १२ पी एच ५५५४ ही विक्रीसाठी ठेवलेली होती. त्यावेळी मिलिंद गुंजाळ यांना सदर कार आवडल्याने त्यांनी सनी दाते याचे फोनवर फोन करून संपर्क केला. मी आर्थिक अडचणींमध्ये असल्याने मला सदर कार विक्री करायची आहे, असं त्यांनी म्हटलं. तेव्हा मिलिंद गुंजाळ हे सदर कार विकत घेण्यास तयार झाले. त्यांचा ६,७०,०००/- रु. मध्ये व्यवहार झाल्यानंतर सनी दाते याने ११००/- रूपये टोकनसाठी मागितल्याने त्यांनी ११००/- रू. ऑनलाईन पाठविले.

त्यानंतर सनी दाते याने मिलिंद गुंजाळ यांना गाडी खरेदीचे रोख रक्कम घेवून मेदनकरवाडी चाकण येथील तिरंगा हॉटेल जवळ बोलावले. तेव्हा मिलिंद गुंजाळ व त्यांचे सहकारी हे गाडी खरेदीसाठी रोख रक्कम घेवून गेले असताना आरोपी सनी दाते याने ६,२०,०००/- रोख रक्कम घेतली. गाडी आळंदी फाटयावर देतो, असे म्हणून फिर्यादी यांना ब्रिझा गाडीमध्ये आळंदी फाट्यावर घेवून गेला. त्यावेळी त्यांना फसवून गाडीतून खाली झेरॉक्स काढण्यासाठी उतरविले व सनी दाते हा गाडी घेवून पळून गेला. या तक्रारीवरून चाकण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर_जाळ्यात_अडकला….

यानंतर पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी सनी सुनिल दाते यांची माहिती घेण्यास सुरूवात केली. सनी दाते याने फिर्यादीस दिलेल्या पत्त्याचे पाषान पुणे येथील घर दोन वर्षापूर्वी विक्री केलेले असल्याचे समजले. त्यानंतर आरोपीची गोपनीय माहिती तसेच त्याचे मोबाईल नंबरची तांत्रिक माहिती घेवून सदर आरोपीस कारसह अतिशय शिताफिने तळेगाव परीतसरात मुंबई-पुणे महामार्गावरील टोलनाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.