लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेश सचिव श्री भरत कारंडे यांनी उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट,,,

लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेश सचिव तसेच नागरी सुविधा मित्र फाऊंडेशन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री भरत कारंडे यांनी मा, खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा येथील निवासस्थानी भेट घेतली,
लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना आणि नागरी सुविधा मित्र फाऊंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या सहकार चळवळी बाबत या वेळी उदयनराजे भोसले यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्था तसेच ईतर ईमारती मध्ये वास्तव्यास असलेल्या नागरीकांसाठी साताऱ्या मध्ये सहकार कायदा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मा, उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात येणार असल्याचे श्री भरत कारंडे यांनी या वेळी सांगितले, सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे उदयनराजे भोसले यांनी या वेळी चर्चा करताना सांगितले असुन लवकरच सातारा जिल्ह्यात सहकार कायदा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाईल असे श्री भरत कारंडे यांनी सांगितले, या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष पंढरीनाथ वैराट व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,