आरोग्य व शिक्षण

संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात शालेय शिक्षणात “भारतीय संविधान” हा विषय सर्व राज्यांनी शिकवणीसाठी सक्तीने घ्यावा.*

रिपाई डेमोक्रॅटिक च्या डॉ. राजन माकणीकर यांची मागणी.

*मुंबई दि (प्रतिनिधी) देशातील सर्व राज्य सरकारणे भारतीय संविधान हा विषय येत्या संविधान दिवसाच्या अमृत महोत्सव वर्षी पासून माध्यमिक अभ्यासक्रमात समावेश करून सक्तीने शिकवण्यात यावा. अश्या आशयाचे पत्र डॉ. राजन माकणीकर यांनी महामहीम राष्ट्रपती द्रोपदि मुर्मु व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.*

देशव्यापी भारतीय संविधान जनजागृती व साक्षरता अभियान राष्ट्रीय आयोजक डॉ. राजन माकणीकर यांच्या नेतृत्वात मागील 10 ते 12 वर्षापासून संविधान जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. सम्यक मैत्रेय फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
नंतर पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा व डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने या अभियानाला गती देण्यात आली.

डेमोक्रॅटिक आरपीआय चे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर राजन माकणीकर असेही म्हणाले की,
अशोक चक्रांकित भारतीय राष्ट्रध्वजा संबंधी केंद्र सरकारने जसे “हर घर अभियान” अभियान राबवून स्वातंत्र्याचा अमृत वर्ष साजरा केला त्याच धर्तीवर संविधान दिनी माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान हा विषय सर्व राज्यांनी समावेश करून सक्तीने शिकवण्यात यावा.
या दिवशी “हर घर भारत का संविधान” अभियान ही राबवावे.

2015 मध्ये, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती वर्ष म्हणून, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 26 नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन” म्हणून पाळण्याचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय अधिसूचित केला होता. संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. परंतु संविधांनाबद्दल लोकांत जागरूकता आली असली तरी भारतीय जनता संविधानाबद्दल साक्षर झाली नसल्याचे दिसून येते ही खंत डॉ. माकणीकर यांना असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये, सरकारची भूमिका, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचे वर्णन केले आहे. कायदेमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय आहे, देश चालवण्यात त्यांची भूमिका काय आहे, या सर्व बाबी घटनेत नमूद आहेत. या व आदी बाबींचा एक सरळ सोप्या भाषेत अभ्यासक्रम बनवून भारतीय संविधान हा विषय माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात घेण्यात यावा असे डॉ. राजन माकणीकर यांचे म्हणणे आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.