युवा क्रांती सभा आणि नफरत छोडो, संविधान बचाओ अभियान आयोजित.११वी संविधान हक्क परिषद ठाणे (मुंब्रा)येथे संपन्न

26 जाने 2023 च्या प्रजासत्ताकदिनी मुंब्रा येथे ११ व्या संविधान हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत प्रसिद्ध, अभ्यासक आणि तज्ञ वक्त्यांनी संविधानिक मूल्यांवर सखोल चर्चा केली. राजे-बाबासाहेब महादेवराव पाटील भोसले यांनी संविधानाची उद्देशिका वाचून या परिषदेचं उदघाटन केले.
2014 ला RSS ने देशाचं कब्जा घेतला असून आता ते लोक संविधान बिघडवून, संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत.अशावेळी संविधान वाचवायचं असेल तर साडेतीन टक्के वाल्यांची नाकेबंदी करावी लागेल असे परखड मत राजे-बाबासाहेब महादेवराव पाटील-भोसले यांनी मुंब्रा येथे झालेल्या ११व्या संविधान हक्क परिषदेत केले.
आपल्या देशाची संविधानिक कायदे- नियम जनतेला माहित नसणं हि आश्चर्यकारक असून,बहुसंख्यांकांनी बोलल्या प्रमाणे प्रत्येक गोष्ट घडावी असं माननं हि लोकशाही नाही तर अल्पसंख्यांक आणि सामाजिक मागासलेल्यांच्या हक्क/अधिकारांचं संरक्षण बहुसंख्यांकांनी करणं हि खरी लोकशाही असल्याचं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी यावेळी केले.
सामाजिक द्वेषातून,हिंसा, हिंसेतून, मतांचं धूव्रीकरण आणि धूव्रीकरणातून एक पक्ष मजबूत करणं,हे घडवलंय जातंय. सामाजिक द्वेष हा संविधानावरच्या हल्ल्याचं मुख्य कारण असून, समाजात पसरविलेला द्वेष लोकशाही प्रेमींना नष्ट करावा लागेल.तसेच सत्य समाजात सांगण्याची जबाबदारी प्रत्येकाला घ्यावी लागेल तरच संविधान वाचविता येईल असे उद् गार या परिषदेला संबोधित करताना डॉ राम पूनयानी यांनी काढले.
आताचं केंद्रातील सरकार हेच संविधानाला धोका आहे.हे सरकार संविधानात मोठ-मोठे बदल करत असुन ईडी,सीबीआय सारख्या सर्व यंत्रणा ताब्यात ठेवून, संविधानिक मूल्यांची राजरोसपणे पायमल्ली करत आहे.संविधान वाचविणाऱ्यांच्या गटात रहायचं की संविधान संपविणाऱ्यांच्या गटात रहायचं हे जनतेने ठरवायचं असा प्रश्न या परिषदेत डॉ सलीम खान यांनी उपस्थित केला.
प्रत्येक मश्जिदीत एक,संविधान ठेवलंच पाहिजे. तसेच दर शुक्रवारी मश्जिदीत संविधानावर बोललं गेलं पाहिजे. अशी भूमिका या परिषदेचे अध्यक्ष नूरूद्दीन नाईक यांनी मांडली. प्रत्येक मश्जिदीत संविधानाच्या प्रस्तावनाची (प्रीअॕंबल) फ्रेम लावण्याचे आवाहनही नूरूद्दीनभाईंनी मुस्लिम समाजाला या प्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना केले. या परिषदेत विशाल हिवाळे,मर्जिया पठान, नेहा नाईक आदींनी विचार मांडले.
संविधानाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या, मेहबूब नाईक,कफिल सय्यद, कल्पना सूर्यवंशी, प्रविण पवार,प्रणय घोरपडे,याकूब खान आदींचा सत्कार संविधानाची प्रस्तावना देऊन करण्यात आला. हि परिषद यशस्वी करण्यासाठी, नदीम खान, जमिल पठान, वाॕल्टर डिसोजा, अवि घोडके, मनिष हिवाळे आदींनी परिश्रम घेतले.