जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा केंद्र कोशिंबी ,भिवंडी येथे 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न*

*प्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान गौरव रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत संविधान सन्मान विषयक घोषणा देऊन जयजयकार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचा- विजय असो,भारतीय लोकशाहीचा विजय असो,स्वातंत्र्य, समता,बंधूता-संविधान सांगते एकात्मता,मिळून सारे देऊ ग्वाही-सक्षम बनवू लोकशाही,ऊठ नागरिका जागा हो- संविधानाचा धागा हो,भारताचे एकच विधान- संविधान संविधान, संविधान आहे महान-सर्वांना हक्क समान,समता बंधुता लोकशाही-संविधाना शिवाय पर्याय नाही!!! असे पोस्टर हातात घेऊन विद्यार्थी जयजयकार करत होते.
संविधान निर्माते महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे यांनी पुष्पहार अर्पण केले तर संविधान प्रतीला सदस्या अनिता मोरे यांनी पुष्प अर्पण करून वंदन केले.
*ध्वजारोहण पूर्वी संविधान उद्दशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले*.
मुख्याध्यापक जगदीश जाधव यांचे हस्ते ध्वज फडकविण्यात आले.
ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन करण्यात आले.यावेळी प्रजासत्ताक दिनाचा- विजय असो,लोकशाहीचा- विजय असो, वंदे मातरम्, संविधानाचा विजय असो अशा घोषणा देऊन जयजयकार करण्यात आला.
*सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त “प्रजासत्ताक दिन व भारतीय संविधान” या विषयावर मार्गदर्शन केले*.
विद्यार्थ्यांनी भाषणे ,समुहगीते,नृत्य सादर केली.
सर्व उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थांना चाॅकलेट वाटप करून तोंड गोड करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच मा.छाया हरड मॅडम, सदस्या नित्या मगर,सदस्य विजय हरड, शंभूप्रतिष्ठान अध्यक्ष प्रा.निवृत्ती मगर, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे,सदस्या अनिता मोरे,मंजुळा फापे,मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख, मातापालक, ग्रामस्थ, युवक युवती ,विद्यार्थी उपस्थित होते.