पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत गणपती उत्सव मंडळांची संयुक्त बैठक आळंदी फ्रुटवाले धर्मशाळा येथे संपन्न,,

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
चाकण विभाग अंतर्गत आळंदी दिघी चाकण महाळुंगे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश उत्सव 2022 चाकण विभाग अंतर्गत असलेल्या गणेश मंडळांची संयुक्त बैठक आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा येथे पार पडली
यावेळी प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक पोलीस उपायुक्त श्री मंचक इप्पर साहेब पोलीस सहाय्यक उपायुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे मॅडम तसेच पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष व चाकण गावचे माजी उपसरपंच श्री कालिदास वाडेकर नगरसेवक डीडी भोसले पाटील सागर बोरोंदिया यांच्या उपस्थितीत श्री गणरायाचे पूजन करून दीप प्रज्वलित करून गणेश उत्सव 2022 मार्गदर्शक व सूचना बैठकीस सुरुवात करण्यात आली
कार्यक्रमाची प्रस्तावना आळंदी शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील गोडसे साहेब यांनी केले तर नंतर सहाय्यक पोलीस उप आयुक्त श्रीमती प्रेरणाकट्टे मॅडम यांनी पोलीस प्रशासन व राज्य शासनाच्या आदेशाबाबत माहिती दिली व मंडळाच्या सर्व पदाधिकारी व उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना यावर सूचना मांडण्यात सांगितल्या यावेळी उपस्थित असलेल्या अनेक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सूचना व समस्या थोडक्यात मांडल्या यावेळी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री कालिदास वाडेकर व राष्ट्रवादीचे नेते डीडी भोसले यांनी आलेल्या मंडळाच्या वतीने सूचना व मंडळांना शांततेत गणेश उत्सव व धार्मिक सलोखा राखून शासनाच्या नियमाचे पालन करून मोठ्या उत्साहात आनंदात गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले
श्री गणपती उत्सवाला सदिच्छा व शुभेच्छा दिल्या यानंतर प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपायुक्त श्री मंचक इप्पर साहेब यांनी गणेश उत्सव मंडळांना कायदा व सुव्यवस्थे बाबत माहिती व मौलिक मार्गदर्शन केले व गणेश मंडळांनी बैठकीत केलेल्या सूचनां विचारात घेऊन पोलीस प्रशासनामार्फत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रम समारोपाच्या वेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वैभव शिंगारे साहेब यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप शिंदे व पोलीस विभागातील गोपनीय पोलीस अधिकारी व पोलीस बांधवांनी बैठकीचे चांगल्या प्रकारे व्यवस्था व नियोजन केले होते या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन निसार सय्यद यांनी केले यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला,