राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या बदलापुर शहर अध्यक्ष पदी श्री संतोष भगत यांची निवड,,

बदलापूर! राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या बदलापुर शहर अध्यक्ष पदी श्री संतोष भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे,आज दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड श्री दिनेश ठाकरे यांनी बदलापुर पश्चिम सानेवाडी या ठिकाणी आयोजित केली होती, या वेळी पक्षाचे बदलापुर शहराचे माजी अध्यक्ष कैलास जाधव यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याने शहराचे पुर्वश्रमीचे उपाध्यक्ष श्री संतोष भगत यांची बदलापुर शहराच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी नियुक्ती पत्र देऊन संतोष भगत यांच्या नियुक्तीची घोषणा केली, या वेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश अकोलकर,युवा नेते बिपिन कटारे, कोकण प्रदेश अध्यक्ष श्री प्रदिप गोविंद रोकडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष दीनेश ठाकरे, यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, आगामी होणाऱ्या बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कार्यकारिणी मध्ये बदल केला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे