कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणूक पुर्ण ताकदीने लढविणार_प्रदिप गोविंद रोकडे(कोकण प्रदेश अध्यक्ष)राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष

बदलापूर,ठाणे (प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाणे जिल्हा पदाधिकारी मेळावा
*राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे* यांच्या प्रमुख उपस्थितीत बदलापूर पश्चिम सानेवाडी येथील विकास गॅलस्की या ठिकाणी संपन्न झाला.या वेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ताकद ठाणे जिल्ह्यात जोमाने वाढत असून.कुळगाव-बदलापूर मध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात अत्यंत जोमाने सुरू असून पदाधिकारी/कार्यकर्ते कुळगाव-बदलापूर सार्वत्रिक नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत त्या मुळे बदलापुर नगरपालिका निवडणुक पुर्ण ताकदीने लढवणार असल्याचे कोकण प्रदेश अध्यक्ष श्री प्रदीप गोविंद रोकडे यांनी म्हटले आहे
मेळाव्याचे नियोजन
*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष ऍड.दिनेशजी ठाकरे* यांनी केले होते.
या निर्धार मेळाव्यास प्रामुख्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष
*राष्ट्रीय प्रवक्ते गिरीशजी अकोलकर सर ,,संपर्कप्रमुख राजनजी भालेराव, युवा नेतृत्व बिपिन अण्णासाहेब कटारे,पत्रकार भरत जी कारंडे,प्रशांत भाऊ कटारे*
यांनी मार्गदर्शन केले.या वेळी *बदलापूर-कल्याण-डोंबिवली-भिवंडी-अंबरनाथ-दिवा-उल्हासनगर-मुरबाड-मुंब्रा-वाडा-आदी ठिकाणचे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
समस्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष वाढीसाठी व बळकटीसाठी आपाआपल्या विभागात जोमाने वाटचाल करण्याचे यावेळी आश्वासन दिले.