मुंबई मध्ये अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयावर महाराष्ट्र पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा धडक मोर्चा

पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र च्या वतीने १६ जून २०२२ रोजी मा. *मिलिंद सुर्वे* (महाराष्ट्र अध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली *अदानी इलेक्ट्रिसिटी* वर विविध महत्वाच्या मागण्यांसाठी पार्टीच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, विजेच्या बिला वर मिटर च्या जोडणी ची तारीख छापून येत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण.होत असल्याने लाईट बिलावर मिटर जोडणीची तारीख नमुद करावी अशी प्रमुख मागणी या वेळी अदानी इलेक्ट्रिसिटी प्रशासनाकडे करण्यात आली होती, सदरच्या मागणीला यश मिळाले असुन अदानी इलेक्ट्रिसिटी प्रशासनाने त्या बाबत अमल बजावणी केली असून लाईट बिलावर मिटर जोडणी ची तारीख छापून येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पक्षाचे नेते अशोक तांबे यांनी दिली आहे. अशा प्रकारे आंदोलन यशस्वी झाले असून सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी मा. अनिल लगाडे उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष , मा. चंद्रकांत रुपेकर कुर्ला तालुका अध्यक्ष,मा.माणिक शिंदे,१४९ वॉर्ड अध्यक्ष राजू डेरे, दिलीपमामा गायकवाड,विष्णू सूर्यवंशी, प्रकाश रुपेकर, नितेश मुदलियार, रतन बनसोडे, श्याम कांबळे, किशोर रगडे, भरत मकासरे, जालिंदर गायकवाड तसेच मुंबईतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या बद्दल सर्व कार्यकर्त्याचे पक्षाचे नेते मिलिंद सुर्वे यांनी अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहेत,