अँड युवराज देवरे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्हा विधी विभाग अध्यक्षपदी निवड,,

नाशिक(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्हा विधि विभाग अध्यक्षपदी नाशिक येथील सुप्रसिद्ध कायदेतज्ञ,ॶॅडव्होकेट युवराज देवरे यांची नियुक्ती
राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे
यांनी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
ॶॅडव्होकेट युवराज देवरे यांनी पूर्वी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती
या सामाजिक संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.
ॶॅडव्होकेट देवरे हे नाशिक जिल्ह्यातील नामवंत वकिलांपैकी एक आहेत त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केलेली असल्याने त्यांचा संपूर्ण जिल्ह्यात चांगला संपर्क आहे, ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल झाल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष जिल्ह्यात गतिमानच होणार असून ते संपूर्ण जिल्ह्याचा दौरा लवकर सुरू करणार असल्याचे त्यांनी आपल्या निवडीनंतर जाहीर केले.
*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचे कुशल नेतृत्व व त्यांची सर्व समाजघटकांप्रती असलेली दूरदृष्टी लक्षात घेता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात अनेक नामवंत लोक प्रवेश करीत आहे*
ऍडव्होकेट युवराज देवरे यांच्या निवडीमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आनंदाचे उत्साहाचे /वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीने समस्त नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावतीने देखील त्यांचे जल्लोषात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी
*राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश जी अकोलकर,महाराष्ट्र प्रदेश महासचिव ऍड.विजय जी पवार,प्रशांत कटारे,प्रामुख्याने उपस्थित होते.*
*अँड रुपाली पवार,अँड वसुंधरा रामराजे यांनी देवरे सरांना शुभेच्छा दिल्या*