अर्धवट बांधकामामुळे बदलापुर ग्रामिण रूग्णालय बनतोय गर्दुले व भिकाऱ्यांचा अड्डा ..मोकाट कुत्र्यांचा, डूक्करांचा सुळसुळाट..

*केंद्रीय मंत्री खासदार श्री. कपिल पाटील व आमदार श्री किसन कथोरे यांच्या मतदार संघातील बदलापुर ग्रामिण रूग्णालयाची अत्यंत दैयनीय दुरावस्था,गाव पाड्यातील रूग्णाचे उपचारा अभावी प्रचंड हाल….*
*बदलापुर ग्रामिण रूग्णालयाचे विस्तारीत बाधकाम गेल्या तीन चार वर्षा पासुन कासवगतीने रखडकाम चालू होते तेही सध्या बंद पडले हे…विस्तारीत बांधकामच बंद असल्यामुळे…सिटीस्कॅन, एक्स-रे,ब्लडलॅब ची सामग्री आज ग्रामिण रूग्णालयात धुळखात पडून आहे..त्यामुळे रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यास ग्रामिन रूग्णालय सपशेल अपयशी ठरले असुन बदलापुर व आजुबाजुच्या ग्रामिण परिसरातील रूग्णाची गाव पाड्यातील गोरगरीब जनतेची उपचारा अभावी प्रचंड हाल होत आहेत … सदर ग्रामिण रूग्णालयाचे रखडलेले बांधकाम तातडीने पुन्हा सुरू करून, लवकरात लवकर रूग्णालयाच्या इमारतीचे बाधकाम पुर्ण करावे व रूग्णालय पुर्ण क्षमतेने सुरू करून गोरगरीब जनतेचे उपचारा अभावी होणारे हाल थांबवावेत….. सदर मागणीची तातडीने दखल घेण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची संबधीतांनी नोंद घ्यावी…..असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे
ठाणे प्रदेश उपाध्यक्ष श्री दत्ता गायकवाड यांनी दिला आहे