“गद्दारांना क्षमा नाही” लेख संग्रहाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन !

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर लिखित “गद्दारांना क्षमा नाही” या राजकिय घडामोडींवरील वैशिष्ठ्यपूर्ण लेखाच्या संग्रहाचे प्रकाशन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई,
आमदार भास्कर जाधव,आमदार रवींद्र वायकर,मिलिंद नार्वेकर,रवी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘ ज्येष्ठ पत्रकार आणि कट्टर उध्दव ठाकरे समर्थक दिलीप मालवणकर यांनी सत्तांतरानंतर घडलेल्या घडमोडींवर आधारित वेळोवेळी लिहिलेल्या समीक्षात्मक लेखांपैकी ४५ निवडक लेखाचा “गद्दारांना क्षमा नाही” हा,
लेखसंग्रह आहे. हे लेख महाराष्ट्रभर प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत.
निष्ठावंत शिवसैनिकांचे मनोबल वाढवणारे व बंडखोरांचे वाभाडे काढणारे हे लेख असून या लेखसंग्रहास प्रकाशनपूर्व नोंदणीही देखील प्रचंड प्रमाणात आहे.
या लेखसंग्रहाचे आकर्षक व समर्पक मुखपृष्ठ दिलीप मालवणकर यांच्या संकल्पनेतीलअसून ते सुप्रिद्ध चित्रकार सुरेश श्रीमणी यांनी साकारले आहे.या लेखसंग्रहास शिवव्याख्याते डाॅ.शिवरत्न शेटे यांची प्रस्तावना लाभली असून आमदार रवींद्र वायकर यांनी विशेष अभिप्राय दिला आहे. हा संग्रह ज्यांना हवा असेल त्यांनी ९८२२९०२४७० या व्हाट्सअप नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन मालवणकर यांनी केले आहे.
या ४५ लेखांच्या स़ंग्रहाची आर्ट
पेपरवर ऑफसेट छपाई केलेली असून त्याचे सवलत मूल्य रूपये दोनशे इतके आहे. या संग्रहाची पहिली आवृत्ती हातोहात संपेल व दुसरीआवृत्ती पुढील महिन्यातच काढावी लागेल,असे मत लेखक व प्रकाशक मालवणकर यांनी व्यक्त केले.
_______________________________________