महाराष्ट्र

आंतर जातीय विवाहाने देशात जातीय तिरस्कार संपुष्टात येईल.

(आर.पी.आय संविधान पक्षाचे संस्थापक महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचे प्रतिपादन)

*मुंबई दि (प्रतिनिधी) हजारो वर्षापासून असलेली जाती व्यवस्था आपल्या समाजात अस्तित्वात आहे. जातीच्या आधारावर भारतीय समाजात अनेक श्रेष्ठ -कनिष्ठ स्तर निर्माण झाले आहेत. जातीचे सदस्यत्व व्यक्तीला जन्माने प्राप्त होते आणि ते मरेपर्यंत व्यक्तीला आपली जात बदलता येत नाही. मात्र: अंतर जातीय विवाह केल्यामुळे जाती व्यवस्था नष्ट होऊन स्त्री पुरुष या दोनच जाती अस्तित्वात राहतील असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केले.*

जाती अथवा जातिव्यवस्था हे भारतीय समाजाचे एक खास वैशिष्ट्य मानले जाते. जातीच्या आधारावर भारतीय समाजात अनेक श्रेष्ठ – कनिष्ठ स्तर निर्माण झाले आहेत. जातीचे सदस्यत्व व्यक्तीला जन्माने प्राप्त होते आणि ते मरेपर्यंत व्यक्तीला आपली जात बदलता येत नाही.
यावर युवक आणी युवतींनीच पुढाकार घेऊन आंतरजातीय विवाह करायला हवे असेही डॉ. माकणीकर म्हणाले.

व्यक्ती जरी जात मानत नसला तरी समाज त्याला त्यांच्या जातीच्या स्थानावरूनच ओळख देतो. हे बदलायला हवे. यासाठी म. बसवेश्वर, छ. शिवराय, क्रांतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महर्षी करवे, राजश्री शाहू आदी महामानवाने कार्य केले… आता त्यांचा वारसा नवयुवकांनी जपला पाहिजे. असेही मत डॉ. माकणीकर यांनी नोंदवले.
_____________________________________

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.