””’’”””’या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की आपल्या महाराजांवर वार करणारा अफझलखान याचा वकिल कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या औलादी आजही जिवंत आहेत _जितेंद्र आव्हाड

मालवणच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे हा फेसबुकवर आपल्या एका मित्राशी माजल्यासारखा बोलतो. त्याचा मित्रही याच्यासारखाच; पुतळ्याच्या डोक्यावर आठवणीची खूणही ठेवली आहेस, असे तो म्हणतो. त्यावर आपटे, ” पुतळा बनवताना पूर्ण अभ्यास करावा लागतो.” असे सांगतो. जर आपटेने पुतळा साकारताना हाच अभ्यास केला असता तर महाराष्ट्राला अपमानित व्हावे लागले नसते. या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले की आपल्या महाराजांवर वार करणारा अफझलखान याचा वकील कृष्णा कुलकर्णीच्या औलादी आजही जीवंत आहेत.
कुलकर्ण्याने केलेला तो वार फक्त महाराजांवर नव्हता, तर तो वार स्वराज्यावर होता. म्हणूनच महाराजांनी आपल्या तलवारीने कुलकर्ण्याचे मुंडके छाटले, हा इतिहास आहे. परंतु,दोन मित्रांमधील फेसबुकवरील चर्चा आणि त्यामध्ये महाराजांच्या डोक्यावरील खुणेचा उल्लेख करून ती दाखवण्याची कृती पाहून, आपटेला ही खूण दाखवण्यासाठीच पुतळा बनवण्यासाठी नियुक्त केले की काय, अशी शंका येतेय… किळस येते या प्रकाराची ! या आपटेला आपटावासा वाटतोय!!