ताज्या घडामोडी

बदलापूर मध्ये लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला,, पत्रकार श्रध्दा ठोंबरे यांना गुन्हे शाखे कडून नोटीस,, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न,,,,,

कुळगाव बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श हास्कुल मध्ये तिन ते चार वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक आत्याचारा विरोधात सर्वात प्रथम धडाडीने आवाज उचलणाऱ्या पत्रकार श्रध्दा ठोंबरे यांना गुन्हे शाखेच्या वतीने नोटीस पाठवून चौकशी साठी हजर होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक आत्याचार करण्याचे प्रकरण शाळा प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्या संगनमताने दडपण्याचा प्रयत्न केला जात असताना, त्या चिमुकल्या जिवांना न्याय मिळवून देण्यासाठी, पत्रकार श्रध्दा ठोंबरे यांनी जोरदार आवाज ऊचलला असताना, शहरातील सर्व सामान्य नागरिक खडबडून जागा झाला आणि बदलापूर मध्ये भुतो न भविष्यती अस विशाल जन आंदोलन ऊभे राहिले आणि राज्यातच नाही तर देश भरात या आंदोलनाचे तिव्र पडसाद उमटले, आणि पोलिस प्रशासन आणि शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले, सरकार मधिल मंत्री,विरोधी पक्षनेते यांनी बदलापुर मध्ये धाव घेत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि आरोपीला अकट करण्यात आली,त्याच बरोबर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे पोलिस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर शाळा प्रशासनावर देखील पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, अनेक आंदोलकांची धरपकड करण्यात आली, त्यांना जेलमध्ये डांबण्यात आले, परंतु प्रामाणिकपणे पत्रकार म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना पत्रकार श्रध्दा ठोंबरे यांना देखील दंगली सारख्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न म्हणजे, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हा फार मोठा घाला आहे आणि आम्ही लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना म्हणून पोलिस प्रशासनाच्या या कृत्याचा जाहीर निषेध करत आहोत, पत्रकार श्रध्दा ठोंबरे यांना चौकशीसाठी दिनांक २ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेच्या भिवंडी कार्यालयात चौकशी साठी हजर होण्याचे समन्स बजावले असुन पोलिस प्रशासन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आदर करतील अशी अपेक्षा लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी व्यक्त केली आहे,लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना श्रध्दा ठोंबरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असुन,वेळ पडल्यास संपूर्ण ताकदीनिशी आम्ही ही लढाई लढु आणि जिंकु देखील असे लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी म्हटले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.