ताज्या घडामोडी

बदलापूर पुर्व अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणी,,,, शाळा प्रशासनावर तातडीने कारवाई करा_प्रदिप रोकडे -ठाणे जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभाग प्रमुख

अंबरनाथ सहाय्यक पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर,,,

कुळगाव बदलापुर पुर्व परिसरातील आदर्श हास्कुल मध्ये दिनांक ११ आणि १२ ऑगस्ट २०२४ सलग दोन दिवस झालेल्या अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या घटना आणि बदलापुर पुर्व पोलिसांनी या बाबत केलेल्या हलगर्जीपणा बाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ यांच्या कडे करण्यात आली आहे,,,

,

कुळगाव बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काहिच दिवसांपूर्वी एका बारा वर्षिय अल्पवयीन मुलीवर अज्ञाताकडुन लैंगिक आत्याचार करण्यात आला आहे, त्या नंतर या घटनेतील आरोपी अद्याप मोकाटच असुन बदलापूर पुर्व पोलिस या आरोपीला शोधण्यासाठी विषेश प्रयत्न करताना दिसत नाहीत,अशाच प्रकारे दिनांक ११ आणि १२ ऑगस्ट रोजी बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श हास्कुल मध्ये चार वर्षिय दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करुन लैंगिक आत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आहे, दोन्ही पिडित मुलींच्या पालकांनी शाळा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाकडे या बाबत तक्रार केली असताना त्यांना जो मनस्ताप सहन करावा लागला तो अतिशय चिंताजनक आहे, तक्रार करण्यासाठी आलेल्या या दोन पिढित अल्पवयीन मुली आणि त्यांच्या पालकांना तक्रार दाखल करुन घेण्यासाठी अनेक तास वाट बघावी लागली, त्या वेळेस काही महिला संघटनांनी तसेच विविध संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतल्या नंतर दुसऱ्या दिवशी या गंभीर घटनेची नोंद घेण्यात आली, बदलापुर पुर्व पोलिस प्रशासनाला गुन्हा नोंद करण्यासाठी एवढा मोठा कालावधी का घालवावा लागला, पोलिस प्रशासन कोणाच्या दबावा खाली गुन्हा दाखल करुन घेत नव्हते,याची चौकशी होणे आवश्यक आहे, वैद्यकीय अहवालात विनयभंग हा लैंगिक आत्याचार करण्याच्या प्रयत्नातुनच करण्यात आला असताना, मुलींना थोडसच लागलय जास्त काही नाही बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांच्या या म्हणण्याचा अर्थ काय घ्यायचा? मुलींवर बलात्कार झाला तरच तो गंभीर गुन्हा आहे,?,अस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांच म्हणण आहे का? असे अनेक प्रश्न ऊपस्थित होत आहेत, या मुळे गुन्हा दाखल करण्यासाठी बदलापुर पुर्व पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणाची चौकशी करून कारवाई होणे गरजेचे आहे,त्याच प्रमाणे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या आदर्श विद्यालयाच्या व्यवस्थापनाची देखील चौकशी होणे गरजेचे आहे,नेमकी घटनेच्या दोन्ही दिवशी शाळेतील सि सी टीव्ही कॅमेऱा बंद कसा होतो ,? आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे,मग या आरोपीला सेवेत घेताना त्याची चारित्र्य पडताळणी करण्यात आली होती का? विद्यालयात शिकत असलेल्या मुलीं साठी त्यांच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासनाने काय उपाय योजना केल्या आहेत किंवा ऊपाय योजना का करण्यात आल्या नाहीत? विद्यार्थ्यांची सुरक्षा व्यवस्था कोणत्या व्यक्तीकडे आहे,मग घटनेच्या वेळी ती व्यक्ती कुठे होती, घटनेच्या वेळी शाळेत किंवा पिडित मुली शिकत असलेल्या वर्गावर कोण शिक्षक होते, एकंदरीत त्या दोन्ही दिवसांची व्यवस्था कोण बघत होते, या सारखे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, तरीही आपण या प्रकरणी जातीने लक्ष घालून दोषी शाळा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आणि तक्रार दाखल करण्यासाठी दिरंगाई करून पिडित मुलींना आणि त्यांच्या पालकांना नाहक मनस्ताप सोसावा लावणारे पोलिस अधिकारी यांच्यावर देखील तातडीने कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल याची कृपया नोंद घ्यावी अशा प्रकारचा इशारा ठाणे जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभाग प्रमुख प्रदीप गोविंद रोकडे यांनी दिला आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.