कुळगाव बदलापुर शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पदी पुन्हा एकदा संजय जाधव यांची निवड,,,.

बदलापूर !! आगामी होणाऱ्या विविध निवडणुकींच्या पाश्र्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाच्या राज्यभरातील कार्यकारण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत,देश पातळीवर ते राज्य पातळीवर आणि राज्यातील जिल्हा तालुका शहर कमीट्यांमध्ये खांदेपालट करण्यात आले आहेत,याच अनुषंगाने बदलापुर शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीची बरखास्ती नंतर पुन्हा नव्याने घोषणा करण्यात आली आहे, बदलापुर शहराला नवसंजीवनी देणारे संजय जाधव यांची पुन्हा एकदा शहर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे, मागील काळात संजय जाधव यांनी शहराची अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमवाजमव करत कॉंग्रेस पक्षाला एक नवीन दिशा देण्याचे काम केले आहे,शहरा मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन, बदलापुर शहरातुन जवळपास हद्दपार होत असलेल्या कॉंग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे काम संजय जाधव यांनी केले आहे, त्यांच्या याच कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेली असुन, पक्षाचे प्रदेश निवडणुक अधिकारी श्री पल्लम राजु यांनी संजय जाधव यांच्या पुर्नरनियुक्तिला मान्यता दिली असून जिल्हा पातळीवर त्यांना नियुक्ती पत्र देण्याचे आदेश जिल्हा अध्यक्ष श्री दयानंद चोरगे यांना दिले आहेत, संजय जाधव यांच्या पुर्नरनियुक्तिने पदाधिकारी व कार्यकर्त्यांन मध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले असून सर्वच स्तरातून संजय जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे,लोकपालक मिडिया कडून देखील श्री संजय जाधव यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा