दिवाळीतील प्रतिकांना आचरणात उतरवून दिवाळी साजरी करा… वासंती दीदीजी

नाशिक-आज माहितीचा स्पोट होईल इतकी माहिती समाज माध्यमांमध्ये उपलब्ध आहे परंतु या माहितीच्या युगात गरज आहे ती चारित्र्य निर्माण करून आदर्श नागरिक घडवण्याची. ब्रह्माकुमारी सारख्या संस्था चरित्र निर्मानाचे महानतम कार्य करीत आहेत. ब्रह्मकुमारी संस्थेच्या समर्पित भगिनी घर संसार सोडून त्याग करून अतिशय समर्पित भावनेने देश विदेशात कार्य करीत असून आजच्या कलियुगात ही खूप मोठी गोष्ट आहे, असे गौरव उद्गार आमदार देवयानी फरांदे यांनी केले
दि. 24 ऑक्टोबर रोजी दीपावली कार्यक्रमाचे आयोजन कलानगर मेरी म्हसरूळ ब्रह्मकुमारी आश्रमात करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार फरांदे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रिय मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी तर वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी ——— बाफना व एअर फोर्स स्टेशन च्या वरिष्ठ मेडिकल अधिकारी सरिता पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय संबोधनात दीदींनी सांगितले की जे धारण केले जाते तोच धर्म व धर्म म्हणजेच कर्तव्य मात्र आज प्रत्येक जण सर्वच क्षेत्रात आपल्या धर्माला विसरला आहे. या पार्श्वभूमीवर निराकार शिव परमात्मा धरतीवर अवतरित होऊन आपल्याला पुन्हा आध्यात्मिक धर्माने अर्थात दैवी व दिव्य गुणांनी युक्त करीत आहे या अध्यात्मिक गुणांनी शक्तींनी युक्त होणे खरा धर्म आहे. ह्या धर्मासाठी कर्म करणे म्हणजेच दीपावली साजरा करणे होय. दीपावलीत जे कर्मकांड करतात ते आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित होऊन केल्यास दीपावली अधिक चांगल्या प्रकारे साजरा होऊ शकते. यात दीपावलीत साफसफाई करण्याची प्रथा आहे बाह्य साफसफाई सोबतच आपल्या अंतर्मनाची सुद्धा साफसफाई होणे गरजेचे आहे. दीपमालेचे सुद्धा महत्त्व याप्रसंगी असते आपणही आपला आत्म दीपक परमात्मा दीपकाशी प्रज्वलित करून इतर इतरांनाही आपल्या आत्म दिपकाने जागृत करावे. नवीन कपडे घालण्यामागील उद्देश हा की आपण इतरांचे दुर्गुण न बघता चांगल्या गुणांचे दर्शन करावे. मिष्टांना खाण्याचा उद्देश हा सर्वांशी गोड वर्तणूक करण्यात असावा अशा प्रकारे दिवाळीतील प्रतिकांना सत्यात व आचरणात उतरवून दिवाळी साजरी केल्यास जीवनात नक्कीच सुख शांती व आनंद निर्माण होईल. बदलां न लो बदल कर दिखलाओ…. स्वपरिवर्तन सो विश्व परिवर्तन… संस्कार परिवर्तन सो संसार परिवर्तन…. अशा काही सूत्रांचे उकल ही याप्रसंगी दीदींनी केले.
वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी यांनी सांगितले की माझ्या पूर्वजांची पुण्याई असेल त्यामुळे आज मी या पुण्यस्थळावर उभा आहे ब्रह्माकुमारी संस्था व वासंती दीदीजी समाज कल्याणाचे अमूल्य कार्य करीत असून या कार्यात येण्याची संधी मिळाल्याबद्दल बेनी यांनी धन्यता मानली. गोदा घाटावर मे महिन्यात होणाऱ्या वसंत व्याख्यान मारलेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत यात ब्रह्मकुमारी संस्थेच्या वक्त्यांचा आजपर्यंत चांगला सहभाग लाभला असून शतकी समारंभासाठी देश परदेशातील दिग्गज व्याख्यात्यांसोबतच संस्थेच्या नामांकित ब्रह्मकुमारी शिवानी दीदींना सुद्धा या व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचे बेनी यांनी सांगितले.
एअर फोर्स स्टेशन च्या वरिष्ठ मेडिकल अधिकारी सरिता पवार या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी ब्रह्माकुमारी संस्थे सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेच्या वरिष्ठ दादींकडून मला डबल डॉक्टर म्हणून संबोधण्यात आले होते शरीर स्वास्थ्यासोबतच रुग्णांची आध्यात्मिक सेवा करण्याचे बळ डबल डॉक्टर या वाक्यातून मला मिळाले.
कार्यक्रमाची सांगता दीदींच्या शुभहस्ते उपस्थितांना एक सुविचार व ईश्वरीय भेट देऊन करण्यात आली. कार्यक्रमात ब्रह्माकुमारी शक्ती दीदी ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी ब्रह्मकुमारी मनीषा दीदी ब्रह्मकुमारी मीरा दिदी ब्रह्मकुमारी गोदावरी दीदी ब्रह्मकुमारी विनादिदी ब्रह्माकुमारी नीता दिली ब्रह्माकुमारी ज्योती दीदी ब्रह्मा आदी समर्पित भगिनीनी सर्व उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी तर स्वागत नृत्य कुमारी स्वराक्षी हिने केले ब्रह्माकुमार ओंकारने भावगीत गाऊन वातावरण अधिकच अध्यात्मिक केले.