बदलापूर पश्चिम होम ल्पॅटफॉर्म पुन्हा वादाच्या भोवऱ्यात,, रिक्षा चालक मालक संघटना आपल्या मागणीवर ठाम,,,,.

कुळगाव बदलापुर पश्चिम बाजारपेठेतील अतिक्रमण हटवण्याची कारवाई दिनांक १७/१८ नोव्हेंबर २०२२ या दोन्ही दिवस पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे, बदलापुर पालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने बदलापुर पश्चिम बाजारपेठेत होम ल्पॅटफॉर्मचा प्रस्ताव मंजूर केला असल्याने त्या साठी अडचण निर्माण करणारी बांधकामे निष्कासित करण्यासाठी कुळगाव बदलापुर नगरपालिका मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांनी आदेश पारित केले आहेत,
परंतु सुमारे चाळीस ते पन्नास वर्षे जुने रिक्षा स्टँड देखील तोडण्यात येणार असल्याने रिक्षा चालक मालक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, पालिका प्रशासनाने दिनांक १७/१८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कारवाई संदर्भात रिक्षा चालक संघटनेला नोटीस बजावली असताना, रिक्षा चालक मालक संघटनांनी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी प्रखर विरोध दर्शवत बदलापुर नगरपालिकेवर धडक मुक मोर्चाचे आयोजन केले होते, या वेळी मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक पालिका कार्यालयावर जाब विचारण्यासाठी दाखल झाले होते, या वेळी मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी रिक्षा चालक मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला आहे,
स्वतः मुख्याधिकारी यांनी रिक्षा स्टँडवर येऊन काही मार्ग निघतो का या साठी पाहणी केली आहे, त्या नंतर रिक्षा चालक यांना पर्यायी जागा देण्यासाठीच आश्वासन दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, परंतु असे कोणतेही आश्वासन पालिका प्रशासनाने आम्हाला दिले नसुन हा पालिका प्रशासनाचा स्वतःचा निर्णय असल्याचे रिक्षा चालक मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकपालकशी बोलताना सांगितले आहे,
जो पर्यंत रेल्वे प्रशासना कडुन आम्हाला मोजमाप करुन रिक्षा स्टँड साठी जागा देण्यासाठी ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमचा विरोध हा कायम असून पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार असलेल्या कारवाईला आम्ही तिव्र विरोध करणार असल्याचे रिक्षा चालक मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे, या मुळे आता पालिका प्रशासन विरुद्ध रिक्षा चालक मालक संघटना असा वाद आता निर्माण झाला असल्याने पुन्हा एकदा होम ल्पॅटफॉर्म वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्याचे दिसून येत आहे,