थोर क्रांतिकारक, जननायक बिरसा मुंडा जयंती डोहोळेपाडा शाळेत उत्साहात साजरी

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,केंद्र कोशिंबी, भिवंडी येथे मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी धरती आबा,थोर क्रांतिकारक, जननायक शहीद बिरसा मुंडा यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
*प्रथम जननायक बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी मेणबत्ती प्रज्वलन करून अभिवादन केले
सर्व विद्यार्थी व पालकांनी प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
*धरती आबा,थोर क्रांतिकारक, जननायक, शहीद बिरसा मुंडा यांचे जन्म,शिक्षण व आदिवासी यांच्या अन्याय अत्याचार विरोधात व न्याय हक्कासाठी इंग्रजांविरूद्ध दिलेल्या लढ्याबद्दल सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी उद्बोधनपर मार्गदर्शन केले*
या वेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चाॅकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले.
आभार मुख्याध्यापक जगदीश जाधव यांनी मानले. सदर जयंती कार्यक्रम निमित्त शाळाव्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष अशोक म्हसकर, मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.