शिक्षक अशोक गायकवाड तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

पंचायत समिती भिवंडी शिक्षण विभागातर्फे तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022/23 शिक्षक गौरव सोहळा शनिवार दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी श्री हालारी ओसवाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शांतीचंदन आॅडिटेरियम भिवंडी येथे उत्साहात संपन्न झाला.
शिक्षक अशोक गायकवाड यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022/23 ने जिल्हापरिषद ठाणे माजी अध्यक्षा दिपाली पाटील मॅडम व पंचायत समिती भिवंडी उच्च श्रेणी गटविकास अधिकारी सन्मानिय प्रदीप घोरपडे साहेब यांचे शुभहस्ते व पंचायत समिती सभापती मा.भानुदास पाटील,उपसभापती मा. श्याम गायखे,गटशिक्षण अधिकारी निलम पाटील मॅडम, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.संजय अस्वले, शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली डोंगरे,यांचे उपस्थितीत शाल,पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
शिक्षक अशोक गायकवाड हे जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,केंद्र कोशिंबी,ता.भिवंडी येथे कार्यरत असून त्यांची सेवा 25 वर्ष पूर्ण झाली आहे. प्रथम जिल्हापरिषद शाळा जानवळ भिवंडी, येथे 12/3/1997 ला रूजू झाले.तिथे एकूण 14 वर्ष सेवा केली त्यानंतर जिल्हापरिषद शाळा करंजोटी येथे 8 वर्ष सेवा व सध्या जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा येथे कार्यरत आहेत.कास्ट्राईब शिक्षक संघटना-महाराष्ट्र राज्य कोकण विभाग उपाध्यक्ष, सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेचे अध्यक्ष तसेच समतासैनिक दल ठाणे जिल्हा प्रमुख संघटक म्हणून काम पाहत आहेत.
त्यांचे मूळगांव बापगाव, ता.भिवंडी,जि.ठाणे असून वासिंद ता.शहापूर येथे स्थायिक आहेत. त्याना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय पातळीवर विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था संघटनांकडून आजपर्यंत 12 पुरस्काराने गौरविण्यात आले आहे
त्यांचे अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम उल्लेखनीय आहेत जसे स्वतःच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप करणे, सर्व महापुरुषांच्या जयंत्या,स्मृतीदिन साजरे करून महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे,संविधान गौरव दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून संविधानाची जनजागृती करणे.विद्यार्थ्यांमध्ये संविधानीक मूल्य रुजवणे,शाळांचा भौतिक विकास करणे,गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे,क्रिडास्पर्धा व विविध गुणदर्शन स्पर्धेत विद्यार्थी प्रथम क्रमांकाने आणने, शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून घेणे,शासनाचे शाळापातळीवरील,अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणे,राष्टीय कामात सहभाग घेणे ,कास्ट्राईब शिक्षक संघटना व सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद मार्फत अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणे.विशेष म्हणजे आजपर्यंत त्यांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांनाच ज्ञानार्जन करण्याचे काम केले आहे.
शिक्षक अशोक गायकवाड यांच्यावर कास्ट्राईब शिक्षक संघटना-महाराष्ट्र राज्य, सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद,केंद्रप्रमुख संघटना-महाराष्ट्र राज्य ,केंद्र कोशिंबी शिक्षक वृंद तसेच अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्था,संघटना,सामाजिक शैक्षणिक श्रेत्रातील पदाधिकारी ,समाजबंधू भगिनी,महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे*
सदर सोहळ्यास जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,गटसमन्वयक, शिक्षक, पालक, अनेक मान्यवर उपस्थित होते.