आरोग्य व शिक्षण
बदलापूर शहरातील नाल्यांमध्ये मेलेल्या डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात रोगराई वाढण्याची शक्यता

बदलापूर मध्ये सातत्याने होत असलेल्या डुकरांच्या मृत्युने शहरा मध्ये एकच खळबळ उडाली आहे,सदरची मृत झालेली डुकर ही शहरातील विविध नाल्यांमधुन वाहत येत असुन,अतिशय कुजलेल्या अवस्थेत असल्याने नाल्यांच्या आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे,
एका आठवडाभरात जवळपास ६० ते ७० डुकरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे,
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पालिका प्रशासनाला या बाबत तक्रार केली असुन, पालिका प्रशासनाचे कर्मचारी हे मृत डुकरे एक एक करुन घेऊन जात आहेत, परंतु आठवडाभरात शहरातील नाल्यांमधुन मोठ्या प्रमाणात मेलेल्या डुकरांची संख्या वाढत असल्याने रोगराईची शक्यता निर्माण झाली आहे,