राष्ट्रिय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचे दिनांक २८ऑगस्ट २०२२ रोजी बदलापुर मध्ये आगमन,,

बदलापूर! राष्ट्रिय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचे दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी बदलापुर नगरीत आगमन होणार आहे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड श्री दिनेश ठाकरे यांनी आयोजित केलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत अण्णासाहेब कटारे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये यांना संबोधित करणार आहेत, बदलापुर पश्चिम सानेवाडी विकास गॅलस्की टॉवर या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न होणार आहे, आगामी होणाऱ्या बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने” मी रिपब्लिकन” चळवळ अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असुन महाराष्ट्र राज्यात या चळवळीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे देखील दिसून येत आहे, आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकीं बाबत अण्णासाहेब कटारे लवकरच पक्षाची भूमिका जाहीर करणार असुन, बदलापुर नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार असल्याचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड श्री दिनेश ठाकरे यांनी सांगितले आहे, बैठकीत ठाणे जिल्हा मुंबई मधिल पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत