महाराष्ट्र

बंबई मल्टी कल्चर फूड हॉटेल चे नाव “बंबई” ऐवजी “मुंबई” करा,,* *हॉटेल व्यवस्थापणा विरोधात मनसेचा आंदोलनाचा ईशारा..

महाराष्ट्राची राजधानी आणि आपल्या देशाचीही आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला काही वर्षांपूर्वी बंबई, बॉम्बे असे संबोधले जायचे परंतु महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहे शिवाय मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्याने आणि महाराष्ट्रातील मराठी भाषिकांच्या मराठी अस्मितेचा आदर,सम्मान करून बंबई, बॉम्बे ही नावे कालबाह्य ठरवून शेवटी मुंबई या नावावर शिक्कामोर्तब केले गेलेले असतांना उल्हासनगर विधानसभा क्षेत्रा मध्ये दिनांक ०१/०१/२०२३ रोजी रिजेंसी अँटिलिया मध्ये एका हॉटेल व्यावसायिकाने नव्याने सुरू केलेल्या आपल्या एका हॉटेल ला *”बंबई”* नाव देऊन मराठी जनतेच्या भावनेशी खेळण्याचे, मराठी अस्मितेला ललकारण्याचे षडयंत्र सदर हॉटेल मालकाने रचलेले असल्याचे सिद्ध होते,अश्याने उल्हासनगर शहरातील आणि आजू-बाजूच्या परिसरातील मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.
तरी नव्याने सुरू केलेल्या हॉटेल व्यवस्थापणाला “बंबई” ऐवजी *”मुंबई”* असे नाव तात्काळ बदली करण्याची समज प्रशासनातर्फे देण्यात यावी, अन्यथा जणभावणेचा उद्रेक होऊन मोठे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आंदोलनातील गंभीर परिणामांना स्वतः हॉटेल व्यवस्थापन आणि या वादग्रस्त उद्घाटन समारंभा प्रसंगी उपस्थित असलेली जबाबदार मंडळी सर्वस्वी जबाबदार असेल असा निर्वाणीचा ईशारा उल्हासनगर मनसे तर्फे प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आलेला आहे.
*यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन कदम, उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, शहर सचिव शालीग्राम सोनवणे, ग्रामीण मनसेचे उप-तालुका अध्यक्ष विवेक गंभीरराव, शहर संघटक मैनुद्दीन शेख, म.न.वि.से. शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.