आरोग्य व शिक्षण

शिक्षण विभाग पंचायत समिती भिवंडी व चाचा नेहरू हिंदी हायस्कूल भिवंडी यांचे संयुक्त विद्यमाने 50 वे भव्य दिव्य तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

50 वे तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शन
– पंचायत समिती भिवंडी व चाचा नेहरु हिंदी हायस्कूल भिवंडी यांच्या संयुक्त समन्वयाने दि. 2/1/2023 व 3/1/2023 दोन दिवस चाचा नेहरु हिंदी हायस्कूल भिवंडी या विद्यालयात संपन्न झाले
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे सभापती.मा. श्री.भानुदास पाटील ,उपसभापती श्री.मुशिर नाचन ,पंचायत समितीचे सन्माननिय सदस्य ,संस्थेचे सचिव श्री.त्रिलोकचंद जी.जैन ,भाभा अँटोमिक रिसर्च सेंटर मुंबई डाॅ.आर.डी.कुलकर्णी वरिष्ठ शास्रज्ञ ,माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक , गटशिक्षणाधिकारी अन्य मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील सुमारे 123 प्रकल्पात शिक्षक ,बालवैज्ञानिक यांचा उर्स्फृत सहभाग होता.यामध्ये इयत्ता 1ली ते 8वी लहान गट तर 9वी ते12वी मोठा गट,त्याच प्रमाणे शिक्षकांचे गटानुसार शिक्षक साहित्य प्रयोग सहभाग होता.


शासकीय परिपत्रकानुसार एकूण सात विविध विषयांवर प्रामुख्याने प्रकल्पावर भर होता.
उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. या वेळी प्रत्येक प्रकल्पाजवळ जाऊन प्रयोग पाहून मान्यवारांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली व समाधान व्यक्त केले.
समारोप व पारितोषक वितरण सोहळा कोकण विभाग पदवीधर शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार श्री.निरंजन डावखरे साहेब, मुख्याध्यापक सुधिर घागस सर विविध शाळांचे मुख्याध्यापक ,विस्तार अधिकारी ,कें द्रप्रमुख , बि.आर. सी .विषय तज्ञ यांच्या उपस्थीतीत संपन्न झाला.


शिक्षक निर्मीत साहित्याचे प्रथम व द्वितीय असे गुणवत्तेनुसार मानांकन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या प्रकल्पामधुन प्रथम , द्वितीय व तृतिय , उत्तेजनार्थ षारितोषके देण्यात आली .मा.निरंजन डावखरे यांनी बक्षिस पात्र विद्यार्थी व उपस्थित बालवैज्ञानिक यांना मार्गदर्शन केले. शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच परिक्षक यांनी देखील
आपले मनोगत व्यक्त केले.

विज्ञान प्रदर्शन संपन्न करण्यासाठी
मुख्याध्यापक प्रेमनाथ दुबे , उपमुख्याध्यापिका जोशी मॅडम, पर्यवेक्षक ,तसेच शाळेचे शिक्षक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले.


कार्यकम यशस्वी करण्यासाठी चाचा नेहरू हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक ,उपमुख्याध्यापक ,पर्यवेक्षक,शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आठ दिवसापासुन खूप परिश्रम घेऊन चांगली पूर्वतयारी करुन विज्ञान प्रदर्शन संपन्न केले.सदर विज्ञान प्रदर्शन पाहण्याचा लाभ सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी घेतला.अतिशय सुंदर विज्ञान सोहळा संपन्न झाला ;असे अनेक मान्यवरांनी मत व्यक्त केले.!

शिक्षण विभाग योजना प्रमुख संजय आसवले ,वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.कार्यक्रमाचे दोन दिवस बहारदार सूत्रसंचालन बाबासाहेब राऊत सर यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.