महाराष्ट्र

कल्याण विभागातील राज्य गुप्त वार्ता विभागातिल वरिष्ठ पोलीस अधिकारी संभाजी नारायण देशमुख यांना पोलिस दलातील विशेष सेवे साठी “राष्ट्रपती पोलीस पदक” पुरस्कार जाहीर

संभाजी देशमुख हे सन २०१६ रोजीचे देखील पोलिस पदक पुरस्काराचे मानकरी

कल्याण !! कल्याण गुप्त वार्ता विभागात कार्यरत असलेले संभाजी नारायण देशमुख यांना पुन्हा एकदा राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार जाहीर झाला आहे, राज्य गुप्त विभाग व पोलिस दलातील संभाजी देशमुख यांनी मागिल ३७ वर्षांपासून वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारणात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत संभाजी देशमुख यांना सन २०१६ साली पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले आहे, आणि आता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या पोलिस दलातील सर्वात मानाचा मानना जाणारा राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार देऊन संभाजी देशमुख यांना सन्मानित करण्यात येणार आहे,

केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतीच राज्यातील पोलीस पदकांची घोषणा केली असून, राज्यातील ९०१ पोलिस कर्मचारी यांना पोलिस पदके तर १४० पोलिस अधिकारी कर्मचारी यांना शौर्य पदक आणि ९३ पोलिस कर्मचारी यांना विशेष सेवे साठी राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत,त्याच प्रमाणे गुणवत्तापूर्ण सेवे साठी ६६८ पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत,सन २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.