आपला जिल्हा
बदलापुर शहरातील रहिवासी भारतीय सीमेवर विशेष सेवा बजावणाऱ्या कर्नल संदीप पेंडसे यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर.!.
( तात्यासाहेब सोनवणे यांजकडून २५ जानेवारी २०२३)

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील कुळगाव सोसायटीतील स्नेही, श्रीमान अजित कुलकर्णी यांचे जावई, सुकन्या सौ. कविता पेंडसे यांचे यजमान कर्नल संदीप अरविंद पेंडसे यांना भारतीय सैन्यदलात कश्मीरच्या अतिसंवेदनशील सरहद्दीवर सेवा बजावत असल्यामुळे, कर्नल संदीप पेंडसे यांना भारत सरकारने ” विशेष सेवा पुरस्कार “जाहिर केल्याबद्दल, बदलापूरकरांच्या वतीने मा. नगराध्यक्ष नंदकिशोर तथा राम पातकर यांनी “कर्नल संदीप पेंडसे” यांचे मनापासून अभिनंदन केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, व महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचे आभार मानले आहेत,